Headlines

'काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात!':शर्मिला ठाकरेंचा आयोगावर घणाघात; आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन




मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून देशभरात, विशेषतः दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीसह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून तीव्र आंदोलने सुरू आहेत. जोपर्यंत निवडणूक आयुक्तांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी ठाम भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडली आहे. या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून मुंबईत ठाकरे गट आणि मनसेने आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच जेजुरीमध्ये मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनीही ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महत्त्वपूर्ण वक्तव्य करत या आंदोलनातील आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात. आता हे बंद करायचं आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. शर्मिला ठाकरे या जेजूरी येथे एका कार्यकर्त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, खरं काम करणाऱ्या माणसांसाठी आज तुम्ही जेजूरीच्या खंडेरायला नवस बोला. यंदा दुष्काळाचं मोठं संकट आहे. मी रस्त्यावर बघितलं सगळी पिकं जळून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील भाव मिळत नसल्याची खंत ठाकरे यआणि बोलून दाखवली. तसेक त्यांनी हे संकट दूर होण्यासाठी आई आंबेला प्रार्थना करते, असेही म्हटले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्कवर सीजेपी, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. या बहुचर्चित आंदोलनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने निवडणूक आयोगाविरोधातील वातावरण अधिकच तापले असून, या तीव्र निदर्शनांनंतर पोलिसांनी कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ही देखील बातमी वाचा.. CEC ज्ञानेश कुमार मोदींना मदत करत आहेत:दिपकेंचा आरोप, म्हणाले- CJP हा स्वतंत्र दबाव गट, पण आमची आणि इंडिया आघाडीची लढाई एकच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सध्या प्रचंड आक्रमक झाली आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी नागपुरात बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, आपली पार्टी ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या CJP च्या नेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून, विशेष न्यायालयाने आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *