![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी सणांची पार्श्वभूमी लक्षात घेत राज्य सरकारने बळीराजाला एक दिलासा दिला आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासोबतच, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात ‘हेड ऑफ द स्टेट’ म्हणून २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठरावही मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; खात्यात जमा होणार ५ हजार रुपये राज्याच्या अनेक भागांत सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. खरिपाचे झालेले नुकसान आणि जवळ आलेली दिवाळी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संवेदनशील निर्णय घेत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ५ हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सणापूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याने बळीराजाला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या योगदानाचा मंत्रिमंडळात गौरव राज्याच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करणारा ठराव एकमताने मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठरावाची माहिती देताना सांगितले की, मोदींनी सलग २५ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम करताना ‘प्रधानसेवक’ हीच भूमिका जपली. ‘संविधान हाच आपला धर्मग्रंथ’ मानून त्यांनी देशात ‘अंत्योदय’ आणि ‘गुड गव्हर्नन्स’चे नवे मॉडेल प्रस्थापित केले. ३७० कलम हटवणे, राम मंदिर निर्मिती, आणि सर्जिकल स्ट्राईक यांसारखे ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच नेतृत्वात झाले. मराठी अस्मितेचा सन्मान आणि उद्योगातील भरारी फडणवीस यांनी आपल्या माहितीतून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरही भर दिला. अलीकडेच मराठी भाषेला मिळालेला ‘अभिजात दर्जा’, नौदलाच्या ध्वजावर विराजमान झालेली शिवरायांची राजमुद्रा आणि १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळवून देण्यासाठी झालेले प्रयत्न, हा महाराष्ट्राचा मोठा सन्मान असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, संरक्षण कॉरिडॉर, छत्रपती संभाजीनगरमधील ‘ऑरिक सिटी’ आणि स्टार्टअप क्षेत्रातील राज्याची घोडदौड यामागे पंतप्रधान मोदींचे भक्कम पाठबळ असल्याचेही या अभिनंदनाच्या ठरावातून स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकासाठी मिळालेली जागा आणि सामाजिक समतेचे विचार रुजवण्यासाठी घेतलेले पुढाकार या सर्वांचा या ठरावात विशेष कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. —————– ही बातमी पण वाचा.. वसुलीसाठी येणाऱ्या बँकवाल्यांना चपलेने झोडपा, मी पाठीशी!: विजय वडेट्टीवार म्हणाले- दसऱ्यानंतर इंडिया आघाडीच्या आंदोलनाची धार वाढणार
“एकीकडे दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या पोटात अन्नाचा दाणा नाही, शेतकऱ्यांच्या मुलांकडे कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत; आणि दुसरीकडे मात्र खाल्लेले जिरवण्यासाठी पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) तब्बल 700 कोटी रुपयांची निविदा काढून ‘पाथवे’ (जॉगिंग ट्रॅक) बांधला जात आहे. या राज्यात ‘अंधेरी नगरी अन् चौपट राजा’ असा भोंगळ कारभार सुरू आहे. दुष्काळी भागात जर कोणी बँकवाला किंवा मायक्रो फायनान्स कंपनीचा माणूस वसुलीसाठी दारात आला आणि महिलांचे फोटो काढू लागला, तर त्याला तिथल्या तिथे चपलेने झोडपून काढा! मला थेट फोन करा, मी तुमच्या पाठीशी उभा राहीन,” असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची मदत:मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा