![]()
धर्म ही आचरणाची गोष्ट आहे. भांडणाची नाही. भरत चौदा वर्षे अयोध्येत राहूनही खुर्चीवर बसले नाहीत. शत्रुघ्नाने कशाला हात लावला नाही. आज राम मंदिरात चोरी होते. आपले धर्माचरण कुणीकडे चालले आहे, ते कळत नाही, असे परखड विचार अॅड. जयवंत बोधले महाराज यांनी निरू
.
भक्ताची निंदा भक्ताची नसते भक्त जिचा दास आहे, त्या मालकाची असते, त्यामुळे माझ्यात जर काही उणेपणा असेल, कान्होपात्रा म्हणते तो माझा उणेपणा नाही, देवा तो तुझा आहे, माझा उणेपणा भरून काढण्याची जबाबदारी तुझी आहे, माझ्या ठिकाणी माझं मीत्व संपलेले आहे.
पांडुरंग हा दयाळू आहे,कृपावंत आहे,भक्तचा अभिनानी आहे,भावाचा भुकेला आहे,कान्होपात्रा ही दास आहे,दास्यत्व ही श्रेष्ठ भक्ती यामध्ये सेवेला महत्व आहे, सेवा हा ज्ञानाचा दरवाजा आहे,काहीतरी घटना घडली की कारुण्यातून दया निर्माण होते ,कृपा ही आपोआप होते.भगवान दयाळू आहे व कृपावंत ही आहे असे विचार”संत कान्होपात्रा अभंग चिंतन ” याचे विवेचन बोधले महाराजांनी केले.
बोधले महाराज म्हणाले, व्यवहारामध्ये मालक शब्दाला किंमत आहे. सेवक शब्दाला तुच्छता आहे. परमार्थामध्ये सेवक शब्दाला किंमत आहे. मालक शब्दाला तुच्छता आहे. परमार्थामध्ये मालक शब्दाला महत्त्व नाही, सेवक शब्दाला महत्त्व आहे. परमार्थ म्हणजे काय? सेवकाची भूमिका जिथे सर्वश्रेष्ठ मानली जाते, त्याचं नाव परमार्थ सेवा नावाच्या दरवाजामध्ये आल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. या प्रवचन मालेला राजमाता पतसंस्थेच्या चेअरमन राधा सुरवसे ,माजी प्राचार्य मीनाक्षी कदम, धनश्री व्यवस्थापक रवी शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.