Headlines

पंढरपुरात महाराजस्व शिबिरात 1023 जणांचे समाधान:तत्काळ दाखले वाटप, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद‎



पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंढरपूरात विविध योजनांच्या

.

पंढरपूर विधानसभा मतदासंघातील नागरिकांसाठी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या शिबिरास आमदार समाधान आवताडे, प्रांताधिकारी सचिन इथापे, बी. आर. माळी, तहसीलदार सचिन लंगुटे, मदन जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एकनाथ बोधले तसेच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे पदाधिकारी व नायब तहसीलदार, मंडलाधिकरी, तलाठी, कर्मचारी उपस्थितीत होते.

या शिबिरात महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थींना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.

या वेळी आमदार समाधान आवताडे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली. तसेच शासकीय योजनांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व निकष याची माहिती ही नागरिकांनी घेतली. शिबिरास अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. महाराजस्व समाधान शिबिरासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आले होते. एकाच छताखाली दाखले मिळणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांनी गर्दी केली होती. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचीही विविध दाखले काढण्यासाठी गर्दी झाली होती.

या वेळी पंढरपूर विधानसभा मतदासंघातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना जिवंत सातबारा उतारे ३१०, राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबतचे प्रमाणपत्र वाटप ४२, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते ७, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना ३७, घरकुल लाभार्थींच्या योजनेसाठी विशेष तरतूद २०, शेतीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफ १३, राज्य शासकीय योजनांचा लाभ २६५, स्थानिक स्वराज संस्थेच्या शासकीय योजनांचा लाभ ५०, इतर विविध योजनांचे लाभ २७९ असे एकूण १०२३ लाभ देण्यात लाभांचे वितरण करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *