Headlines

राज्यस्तरीय नाट्यछटा महोत्सवात बालकलाकारांचा डंका‎:नगर, पुणे, बीड जिल्ह्यांतील 219 बालकलाकारांचा सहभाग, स्पर्धेतील विजेते घोषित



येथील बालरंगभूमी परिषद शाखेतर्फे मानसी भणगे स्मृती राज्यस्तरीय नाट्यछटा महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा रविवारी पेमराज सारडा महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. अभिनेते हरीष बारस्कर व दिग्दर्शक अभिजित दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दळव

.

२१९ स्पर्धकांनी सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक आणि विनोदी विषयांवर आधारित नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद भणगे केले. नाट्यछटा महोत्सवाचे हे सातवे वर्ष असून नगर जिल्ह्यासह पुणे, शिरूर, बीड शहरातून स्पर्धेसाठी बाल कलाकार दरवर्षी येतात. त्यामुळे स्पर्धेचे दर वर्षी आयोजन करण्यात येईल असे आश्वासन सतीश लोटके यांनी दिले.

यावेळी “कल्पनेची फुले” या प्राची भदे लिखित नाट्यछटा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सोनाली दरेकर, सपना साळुंके, तेजा पाठक, ऋतुजा पाठक, अनंत जोशी, शैलेश देशमुख, विराज अडगटला, तेजस अतितकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीया देशमुख यांनी केले तर आभार देवीप्रसाद सोहिनी यांनी मानले.

या स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १० वी गटात सर्वोत्कृष्ट : तनुष वाझा, साईराज सरडे, इशिता उगले, उत्कृष्ट : राजेश्वरी जाधव, आर्य खराडे, शिवराज होंडारे, उत्तेजनार्थ : वेदिका लोंढे ,संदेश ढोकणे, शार्वी कराळे, राही धुमाळ, अनुजा शिंदे.

इयत्ता४ थी ते ७ वी गटात सर्वोत्कृष्ट : श्रीयांश घोडके, सायली गिरी, ओजस्वी पाठक, उत्कृष्ट : मनस्वी भणभणे, प्रभास पाठक, ओवी देव, उत्तेजनार्थ : श्रावणी कोहोकडे, स्वरा गाडेकर, श्रेया कोकाटे, मनस्वी सोहोनी, नीलम साठे. इयत्ता पहिली ते तिसरी गटात सर्वोत्कृष्ट : शिवन्या राऊत, आराध्या वाघमोडे, विदिशा राऊत, उत्कृष्ट : सान्वी कराळे, पूर्व उगले, प्रज्ञा जोशी, उत्तेजनार्थ : ध्वज मुनोत, सार्थक अरगडे, नायरा कटारिया, नीलांबरी भिंगारदिवे, अरिणी खानवेलकर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *