Headlines

पुणे शहरात तडीपार केलेले तीन गुंड पुन्हा पकडले:मंडई, येरवडा अन् कात्रज परिसरात पोलिसांची कारवाई




पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तीन गुंडांना पोलिसांनी पुन्हा शहरात आल्याने अटक केली आहे. मंडईतील वाहनतळ, येरवडा आणि कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महात्मा फुले मंडई परिसरातून साहिल रफीक कलादगी (वय 24, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला पोलिसांनी पकडले. सहायक पोलिस फौजदार अविनाश इंगळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. साहिल याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील तो शहरात तडीपार कारवाई नंतर बेकायदेशीर फिरत होता असे दिसून आले आहे. पोलिस हवालदार एस. गोंजारी पुढील तपास करत आहेत. दुसऱ्या एका कारवाईत आंबेगाव पोलिसांनी जांभुळवाडी तलाव परिसरातून तडीपार गुंड तुषार कृष्णा कुचेकर (वय 21, रा. शनीनगर, कात्रज) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडीपार कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई पोलिसांनी केली. पोलिस शिपाई शिवाजी आटोळे यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस हवालदार मोरे तपास करत आहेत. येरवडा भागातील तारकेश्वर मंदिराजवळून शशी पांडू चव्हाण (वय 43, रा. सेवालाल चौक, येरवडा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले होते. पोलिस शिपाई राहुल परदेशी यांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार एन. निलख या प्रकरणाचा तपास करत आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले जाते. या कालावधीत त्यांना शहरात प्रवेश करण्यास बंदी असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *