![]()
अमरावती शहरातील राजकमल चौक ते अंबागेट आणि गांधी चौक ते जवाहर गेट या मध्यवर्ती आणि अतिवर्दळीच्या परिसराची आमदार सुलभाताई खोडके यांनी शनिवार, ८ ऑगस्ट रोजी पाहणी केली. वाहतुकीसाठी सुटसुटीत आणि लख्ख प्रकाशाने उजळणारा परिसर तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे निवडक पदाधिकारी, अधिकारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आमदार खोडके यांनी सध्याची परिस्थिती आणि विकासात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यांनी डेकोरेटिव्ह विद्युत पोल बसवणे, रस्ता काँक्रिटीकरण आणि नाली बांधकाम यांसारख्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले. या कामांमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. आमदार खोडके यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पवार फोटो स्टुडिओसमोरील गांधी चौक नमुना गल्ली पोच रस्त्याचे काँक्रिटीकरण, राजकमल चौक ते अंबागेट आणि गांधी चौक ते जवाहर गेटपर्यंत डेकोरेटिव्ह विद्युत पोल बसवणे, प्रभाग क्रमांक १४ बुधवारा येथील टायगर चौक ते कैची धार गल्लीचे काँक्रिटीकरण व नाली बांधकाम, तसेच जवाहर गेट ते बर्तन बाजार ते बुधवारा परिसरात डेकोरेटिव्ह पोल व एलईडी लाईट बसवणे यांसारख्या विकासकामांचा समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कामांमध्ये कोणतीही तडजोड न करता उच्च दर्जा राखण्याचे, विद्युतीकरण आधुनिक व सुरक्षित पद्धतीने करण्याचे आणि नागरिकांना दीर्घकाळ टिकणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. या विकास कामांमुळे परिसराचे सौंदर्य अधिक खुलणार असून वाहतूक, प्रकाश व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार खोडके यांच्यासोबत शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, कर्नलसिंह राहल, नगरसेविका लविना हर्षे व स्वाती कुलकर्णी, मनपा उपअभियंता विवेक देशमुख, कनिष्ठ अभियंता लक्ष्मण पावडे, विद्युत विभागाचे अधीक्षक शरद तिनखेडे, महेंद्रभाई भूतडा, वसंतभाई कलंत्री, राजू अग्रवाल, राजूभाई चुडीवाले, रामेश्वर उपाध्याय, नरेश शिंदे, सचिन शर्मा, पिंटू शर्मा, पवन पितलिया, मनीष चौबे, श्यामराव टोपे, अनिल पुरोहित, विशाल कुलकर्णी, सोनू व्यास, सत्यजीत अग्रवाल, विवेक पवार, मनोज केवले, निलेश शर्मा, भास्कर ढेवले, आनंद बुंदेले, अमन गुप्ता, रोहित संगेले, अभी गाडेकर, गणेश वर्मा आदींसह या भागातील नागरिक उपस्थित होते.
Source link
अमरावतीचे राजकमल, गांधी चौक परिसर लख्ख प्रकाशाने उजळणार:आमदार सुलभाताई खोडके यांच्या निर्देशानंतर विकासकामांना गती