Headlines

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक:रहिमापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल




अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी गजानन राजू तायडे (वय २६) या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन तायडेची सुमारे वर्षभरापूर्वी पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात संपर्क वाढला. फिर्यादीनुसार, ६ ऑगस्ट रोजी आरोपीने सातेगाव फाटा येथून मुलीला मोटारसायकलवर बसवून अंजनगाव सुर्जी येथील वाघपुरा (सुर्जी) येथील आपल्या घरी नेले. तिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. याचवेळी आरोपीने मुलीचे काही फोटो मोबाईलमध्ये काढले. संबंध तोडल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीच्या जबाबावरून रहिमापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास रहिमापूरचे ठाणेदार प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दिलीप घोडे करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *