![]()
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अमरावती येथे सत्कार करण्यात आला. त्यांना बोधीवृक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला. मुंढे अलिकडेच ‘तरुणाईशी संवाद’ या कार्यक्रमासाठी अमरावतीत आले होते. यावेळी वृक्ष लागवडीचे प्रणेते प्रवीण वासनिक आणि सम्यक फूड प्रा.लि.चे संचालक डॉ. विलास मेश्राम यांनी येथील विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन हा सत्कार केला. यावेळी प्रवीण वासनिक यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या मते, अनेक आयएएस अधिकारी झाले असले तरी, मुंढे यांचे नाव महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानी आहे. त्यांनी २१ वर्षांच्या सेवेत अनेक बदल्या आणि चढ-उतार पाहिले असले तरी, तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही आणि भारतीय संविधानाशी एकरूप होऊन कर्तव्य बजावले. प्रवीण वासनिक हे केवळ वृक्ष लागवडीचेच नव्हे, तर गाजर गवत निर्मूलन अभियानाचेही प्रणेते म्हणून ओळखले जातात. त्यांना या कार्यासाठी नेहरू युवा केंद्राचा अमरावती जिल्हा युवा पुरस्कारही मिळाला आहे. या भेटीदरम्यान, तुकाराम मुंढे यांनी वृक्ष लागवड आणि बुद्धांचे तत्त्वज्ञान या विषयांवर वासनिक आणि मेश्राम यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Source link
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अमरावतीत सत्कार:बोधीवृक्ष आणि 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथ भेट