Headlines

अमरावती-बडनेरा जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण:मोर्शीजवळच्या गळतीमुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा शुक्रवारपासून नियमित मिळेल




अमरावती आणि बडनेरा उपनगराचा बुधवारपासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा शुक्रवार, १६ ऑक्टोबरपासून पूर्ववत होईल. मोर्शी तालुक्यातील निंभीजवळ जलवाहिनीला गळती लागल्याने हा पुरवठा थांबला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने (मजीप्रा) युद्धपातळीवर दुरुस्ती केली. गुरुवारी पहाटे जलवाहिनी पूर्ववत झाली. त्यानंतर चाचणी घेऊन गुरुवारी सायंकाळी शहराच्या काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला. मजीप्रा अधिकाऱ्यांनुसार, बुधवारचा पाणीपुरवठा बंद असलेल्या लोअर झोनमध्ये गुरुवारी पाणी आले. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ज्या भागांना पाणी मिळणार होते, त्यांना आता शुक्रवार, १६ ऑक्टोबरला पाणी मिळेल. नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी सांगितले की, तांत्रिक बदलांमुळे १३ ऑक्टोबरला पाणी मिळालेल्या भागांना १६ ऑक्टोबरला नियमित वेळेनुसार पाणी मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *