Headlines

वृक्षसंवर्धनासह शिस्त, देशप्रेम व व्यसनमुक्तीचा संदेश:अहमदपूरच्या यशवंत विद्यालयातील एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लावले बेलफळ, आंब्याचे झाड‎



शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम, शिस्त, देशप्रेम आणि राष्ट्रसेवेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री लोहारे डी. बी. यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूरच्या एनसीसी विभागाच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम उ

.

एनसीसी विभागाच्या प्रमुख श्रीमती मधुबाला आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गौरव चवंडा यांच्या सहकार्याने एनसीसीच्या मुला-मुलींच्या पथकाने या वृक्षारोपण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला. केवळ वृक्ष लावणे नव्हे, तर लावलेल्या वृक्षांची नियमित काळजी घेणे हीदेखील प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

वाढते शहरीकरण, घटते वनक्षेत्र, बदलते हवामान आणि वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न यशवंत विद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांनी लावलेली झाडे भविष्यात मोठी होऊन परिसराला हिरवाई देण्याबरोबरच पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचा अनमोल ठेवा ठरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

वृक्षारोपण कार्यक्रमानंतर शाळेचे उपमुख्याध्यापक माधव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना रुजवली जाते. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात शिस्तीचे पालन करून जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

देशाची प्रगती ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थीदशेपासूनच राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि सेवाभाव जोपासला तर भविष्यात सक्षम व जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्र-मैत्रिणींनाही व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

पर्यावरणपूरक, व्यसनमुक्त जीवनशैलीचा अवलंब करावा वृक्षारोपण आणि व्यसनमुक्ती या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘पर्यावरण वाचवा आणि जीवन वाचवा’ हा व्यापक संदेश मिळाला. निसर्गाचे संवर्धन आणि मानवी जीवनाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी परस्परांशी निगडित असून, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व व्यसनमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *