Headlines

पुण्यात दारूच्या पैशांवरून तरुणावर प्राणघातक हल्ला:डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न, आरोपी अटकेत




पुणे शहरातील गुलटेकडी येथील डायसप्लॉट परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय 30, रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेम संजय काळे (वय 28, रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजूची आई लक्ष्मीबाई (वय 58) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेम काळे हा जखमी राजू इककळकीच्या ओळखीचा आहे. प्रेमने राजू इककळकीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. राजूने पैसे देण्यास नकार दिल्याने प्रेम संतप्त झाला.संतप्त झालेल्या प्रेमने राजू इककळकीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने राजूच्या डोक्यात दगड मारला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या राजू इककळकीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी प्रेम काळेला पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलिस निरीक्षक एस. शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मुलीला नांदविण्यास न पाठविल्याने सासऱ्यावर शस्त्राने वार माहेरी निघून आलेल्या पत्नीला नांदविण्यास न पाठविल्याने सासऱ्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना मॉडेल कॉलनी भागात घडली. सासऱ्याचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तात्रय भिमाजी विटकर (वय 70, रा. मारुती मंदिराजवळ, वडारवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी जावई मधुकर हडकमोल (वय 45, रा. आमोदा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विटकर यांचा मुलगा शशिकांत (वय 40) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय विटकर यांच्या मुलीचा आरोपीशी विवाह झाला आहे. कौटुंबिक वादातून विटकर यांची विवाहित मुलगी चार महिन्यांपूर्वी माहेरी निघून आली होती. मुलीला नांदविण्यास पाठवावे, असे आरोपीने विटकर यांना सांगितले होते. विटकर हे मॉडेल कॉलनीतील एका सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतात. 12 ऑगस्ट रोजी आरोपी जावई विटकर यांच्या कामावर दुपारी साडेबाराच्या सुमारास गेला. मॉडेल कॉलनीतील सोसायटीच्या आवारात सासऱ्याशी वाद घालून त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. विटकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *