Headlines

नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना:मंगळवेढ्यामध्ये दि. 15 ते17 ऑगस्टदरम्यान धार्मिक सोहळा, विविध कार्यक्रमांचे आयोजन‎



श्री संत दामाजीपंत यांच्या नवीन मंदिरातील मंदिर पूजन, मूर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १५ ते १७ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, सामुदायिक संगीत भजन, ज्ञानेश्वरी हरिपाठ, कीर

.

शनिवार, दि. १५ रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत पूजा-पठन, वास्तुपूजन व देवता जलाधिवास हा धार्मिक विधी होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत सामुदायिक संगीत भजन, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ज्ञानेश्वरी हरिपाठ होईल. रात्री ७ ते ९ या वेळेत सोलापूरच्या सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तन होणार आहे.

रविवार, दि. १६ रोजी होम-हवन पूजा व देवता धान्याधिवास हा धार्मिक विधी होणार आहे. यानंतर सामुदायिक संगीत भजन, ज्ञानेश्वरी हरिपाठ आणि रात्री कृष्णा पोतदार महाराज (पंढरपूर) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. १७ रोजी या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार असून, यावेळी विविध धार्मिक विधींसह मूर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण करण्यात येणार आहे. यानिमित्त महाप्रसाद, सामुदायिक संगीत भजन व ज्ञानेश्वरी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गोपाळ आण्णा तुकाराम वासकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

मंदिराच्या कळशारोहणाचा मान सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. सोहळ्यातील सर्व धार्मिक विधींचे मुख्य पुरोहित वेदमूर्ती चिंतामणी कृष्णांत जोशी व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत. या धार्मिक सोहळ्यासाठी सौ. व श्री. प्रसाद कुलकर्णी तसेच विठ्ठल (दादा) वास्कर महाराज यजमान म्हणून सेवा बजावणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *