![]()
शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गुरुद्वारा परिसरात हा प्रकार घडला असून, यामध्ये बादल यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने सध्या ते धोक्याबाहेर आहेत. हल्ला नेमका कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीर सिंह बादल हे आपल्या कुटुंबासह नांदेडमधील ऐतिहासिक गुरुद्वारात दर्शनासाठी आले होते. ते गाडीतून खाली उतरून गुरुद्वारात जाण्यासाठी निघाले असतानाच, अचानक दोन जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मात्र, बादल यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांनी तत्परता दाखवत हा हल्ला हाणून पाडला. या झटापटीत सुखबीर बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेला एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. हल्लेखोरांची माहिती अद्याप अस्पष्ट या हल्ल्यामागे नेमके कोण होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. हल्ला करणारे दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत की त्यांना पकडण्यात आले आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…
Source link
अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला:उपचारासाठी रुग्णालयात दाखल