Headlines

कुर्ला दरड दुर्घटना:मृतांचा आकडा 8 वर, तर 4 जणांची सुखरूप सुटका; बचावकार्य अखेर थांबले




मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोध आणि बचाव मोहीम अखेर पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) गुरुवारी दुपारी १.२५ वाजता नागरी प्रशासनाशी समन्वय साधून मोहीम अधिकृतपणे बंद केली. या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शोधमोहीम पूर्ण दरड कोसळल्यानंतर एनडीआरएफ, मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त पथकांनी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि विशेष पथकांची मदत घेण्यात आली. सर्व संभाव्य ठिकाणांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणि आणखी कोणीही अडकले नसल्याची खात्री झाल्यावर दुपारी १.२५ वाजता शोधमोहीम अधिकृतपणे थांबवण्यात आली. मृतांचा आकडा ८ वर NDRF च्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकूण १२ जण अडकले होते. त्यापैकी ८ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले, तर ४ जणांना सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, जखमींवर उपचार सुरू असताना सद्दाम वझीर अली खान (वय २८) यांना राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्यामुळे मृतांचा आकडा ८ वर पोहोचला. संयुक्त प्रयत्नांमुळे चार जणांचे प्राण वाचले या संपूर्ण बचावकार्यात NDRF, मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम केले. अत्यंत अरुंद परिसर आणि सततचा पाऊस यामुळे बचावकार्याला अनेक अडचणी आल्या, तरीही चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात पथकांना यश आले. दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. पहाटेच्या गाढ झोपेतच काळ आला! स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याच दरम्यान, पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग खचला आणि माती, तसेच दगडांचे मोठे ढिगारे खाली असलेल्या दोन-तीन घरांवर येऊन कोसळले. सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने घरातील नागरिकांना जीव वाचवून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. हेही वाचा.. मोशी कचरा डेपो दुर्घटना: पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, भोसरी एमआयडीसी पोलिसांत नोंद मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगार नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली नागेश गायकवाड (वय २३) यांनी मोशी परिसरातील संजय गांधी नगर झोपडपट्टीत राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री घडली. भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिली. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *