Headlines

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण:24 ऑगस्टपासून नाशिकमध्ये 10 दिवसीय शिबिर, संघटन बळकटीवर भर




काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांसाठी नाशिक येथे २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी विशेष मार्गदर्शन करणार असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसह नव्या नेतृत्वाची जडणघडण करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘संघटन सृजन अभियाना’अंतर्गत आयोजन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या व्यापक दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाची रूपरेषा आखण्यात आली आहे. बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून तळागाळातील जनतेशी संपर्क कसा वाढवावा, यावर यात भर दिला जाणार आहे. शिबिरातील प्रमुख विषय आणि मार्गदर्शक: वैचारिक मंथन: शिबिरामध्ये काँग्रेस पक्षाची पुढील दिशा, पक्षासमोरील आव्हाने, विचारधारा, संघटनात्मक बांधणी आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा होईल. तरुणांच्या प्रश्नांवर भर: नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि राजकीय दृष्टिकोन समजून घेण्याला या संवादात विशेष महत्त्व दिले जाणार आहे. दिग्गज नेत्यांची उपस्थिती: राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष खासदार शशिकांत सेंथिल हे तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. तसेच, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक वरिष्ठ नेते प्रशिक्षणार्थींशी संवाद साधतील. प्रशिक्षणाची धुरा: सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील AICC प्रशिक्षण टीम या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रमदान आणि मनरेगाचा प्रत्यक्ष अनुभव या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रशिक्षणार्थी केवळ वर्गात बसून मार्गदर्शन घेणार नाहीत, तर ते दररोज ‘श्रमदाना’तही सहभागी होतील. ग्रामीण भागातील वास्तव, तिथली अर्थव्यवस्था आणि जनतेचे दैनंदिन प्रश्न जवळून समजून घेण्यासाठी त्यांना ‘मनरेगा’ (MNREGA) अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाणार आहे. श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावरही या प्रशिक्षणात भर देण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे. हेही वाचा.. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला:गुरुद्वारात फिरत असताना घडला प्रकार; 2024 मध्ये सुवर्ण मंदिरातही झाला होता जीवघेणा हल्ला नांदेडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे (SAD) अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, नांदेड येथील गुरुद्वारा माता साहिब कौरमध्ये एका निहंगाने त्यांच्यावर कृपाणाने हल्ला केला. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली आहे, तर त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेला एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *