Headlines

अशोक पर्वात संविधानाचा जागर; 500 प्रतींचे करणार वितरण:मूल्यांच्या जपणुकीसाठी सम्राट अशाेक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटनेचे आयाेजन



भारतीय सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या राज्यस्तरीय “अशोक पर्व महोत्सवा’त यंदा एक विशेष आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. या महोत्सवात तब्बल ५०० भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात येणार असून,

.

मूर्तिजापूर तालुक्यातील भवनसुंदर वानखडे यांचा हा उपक्रम असून त्यांनी ५०० संविधान प्रतींचे दान देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असलेले भवनसुंदर वानखडे हे वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने नेहमीच पुस्तक दानाचे कार्य करीत असतात. महोत्सवाच्या निमित्ताने भगवान बुद्ध, महापुरुषांची चरित्रे आणि भारतीय संविधान यांचे वितरण करण्यात येणार असून, हा कार्यक्रम अकोला येथे पार पडणार आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, या उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक पर्व आयोजन समितीकडून भवन सुंदर वानखडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. संविधानाच्या ५०० प्रतींचे दान स्वीकारताना अशोक पर्व महोत्सव समितीने भवनसुंदर वानखडे यांचे आभार व्यक्त करून सन्मानही करण्यात आला. याप्रसंगी प्रा. विजय आठवले, डॉ. प्रा. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, प्रा. शैलेश इंगळे, विद्याधर मोहोड, सुमेध घनबहादूर, संदेश गवई, प्रा. विवेक पांडे, प्रा. सज्जन जाधव आदी उपस्थित होते.

निबंध स्पर्धेसाठी दोन गट ठेवण्यात आले आहेत. पहिला गट १० ते १८ वर्षाचा असून यात सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या विचारांवर आधारित विषय आहेत. १८ वर्षांवरील खुला गटात संविधान, लोकशाही, सामाजिक परिवर्तन, मानवता व धम्मविजय यांवरील विषय आहेत. “सम्राट अशोक यांचा संविधानिक मूल्यांवर प्रभाव’ हा यंदाचा प्रमुख विषय असून अहिंसा, समता, न्याय, करुणा व लोककल्याणकारी राज्यकारभार या मूल्यांचा अभ्यास करण्याची संधी सहभागींस मिळणार आहे.

निवडक निबंधांचे महोत्सवात सादरीकरण : उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार असून निवडक निबंधांचे महोत्सवात सादरीकरण होणार आहे. नोंदणी व माहितीसाठी फुले आंबेडकर शिक्षक संघटना पॅक्टो जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांचेशी संपर्क साधावा. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. विजय आठवले, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, विद्याधर मोहोड, प्रा. शैलेश इंगळे, प्रा. सज्जन जाधव, प्रा. विवेक पांडे, संदेश गवई, सुमेध घनबहादूर आदींनी केले आहे.

महोत्सव ठरेल परिवर्तनाची नांदी : भारताच्या इतिहासातील महान सम्राट अशोक यांच्या समता, बंधुता, लोकशाही, लोककल्याण, अहिंसेच्या विचारांचा व धोरणांचा प्रसार करून समाजात नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव हा परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी व्यक्त केल आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी “घराघरात अशोक’ ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांचे म्हणणे आहे.

असा होणार महोत्सव : महोत्सवात व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजजागृती रॅली तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सम्राट अशोक यांच्या स्वर्णीम इतिहासाचा उजाळा देत समाजात सकारात्मक व परिवर्तनवादी विचारांची रुजवात करण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक व धार्मिक प्रबोधनासाठी भवन सुंदर वानखेडे यांनी पाचशे धम्मग्रंथांचे दान जाहीर केले असून हे ग्रंथ उपासक-उपासिका संघटनांना वितरित करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे अशोक विचारांचा प्रसार अधिक व्यापक होणार आहे.

“अशोक पर्व महोत्सव’ अंतर्गत होणार निबंध स्पर्धा राज्यस्तरीय ‘अशोक पर्व महोत्सव’ अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक परिवर्तनाच्या मूल्यांना चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *