कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विशेषतः राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकु
.
गोंदिया येथे पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जरांगे पाटील हे मानसिकदृष्ट्या विकृत स्वभावाचे असून त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत. राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात कोणावरही टीका करताना भाषेची मर्यादा आणि आचारसंहिता पाळणे अत्यंत गरजेचे असते. टीका सकारात्मक किंवा योग्य दृष्टिकोनातूनही करता येते, मात्र मनोज जरांगे पाटील हे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. तसेच कोणाला काय आणि कसे बोलावे याचे भान त्यांना उरलेले नाही, असेही रहांगडाले म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापू लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचा दौरा करत ठिकठिकाणी इशारा बैठका घेतल्या. या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारवर, विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर आणि कडक शब्दांत टीका केली.
तसेच, कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयावरून जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही थेट लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आणि त्यांनी केलेल्या टीकेमुळे आता भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेतेही चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी जरांगे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
या संदर्भातील ही देखील बातमी वाचा
तुम्ही व्यथित झालात, मलाही वाईट वाटलं:पण मराठ्यांच्या नादी लागून मोठी चूक केलीत; चंद्रशेखर बावनकुळेंना मनोज जरांगेंचा टोला

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली होती. बावनकुळेंच्या या भावुक व्हिडीओवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही आईचे नाव घेतले, त्यामुळे तुम्हाला मी पहिल्यांदा माफ करून सोडून देतो, इथून पुढे मी तुमच्यावर व्यंग करणार नाही,” असे जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, याचवेळी त्यांनी बावनकुळेंना २८ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांसंदर्भात चूक सुधारण्याचा अल्टीमेटमही दिला आहे. वाचा सविस्तर