Headlines

कन्नड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा:अर्जुन पाटील यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे‎




तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, करंजखेडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये रस्त्यांअभावी दळणवळण अवघड झाले आहे. या रस्त्यांसाठी विशेष अतिरिक्त निधी देण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अर्जून नितीन पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कन्नड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य अर्जून पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास अकोलकर, रावसाहेब निकम, विनायक चव्हाण, मनोज देशमुख यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. कन्नड तालुक्यात ऐतिहासिक गौताळा अभयारण्य आहे. निसर्गप्रेमी व पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र गौताळा चौफुली ते करंजखेडा गौताळा चौफुली ते नागद या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. साखरवेल ते करंजखेडा या रस्त्याची दुरावस्था आहे. तालुक्यातील साठ टक्के पाणंद रस्त्यांची बिकट अवस्था आहे. जलजीवन मिशनची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कन्नड तालुक्याच्या विकासाचा मोठा अनुशेष आहे. याचा विचार करुन विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष अतिरिक्त निधी देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. कन्नड तालुक्यातील विविध प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढू असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आश्वासित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *