Headlines

पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे:वातावरण बदल आणि दुष्परिणाम विषयावर वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक डॉ वाघमारे यांनी केले मार्गदर्शन‎




मानवी जीवन निरोगी जगण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, तसेच पर्यावरणाला जपणाऱ्या वनस्पतींचेही जतन झाले पाहिजे, असे प्रतिपादन वनस्पती शास्ञाचे अभ्यासक डॉ भगवान वाघमारे यांनी केले. लातूर येथे कलापंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालूका स्तरीय वातावरण बदल आणि त्याचे दुष्परिणाम प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी,शिवदर्शन सदाकाळे,असमा शेख,आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की बियाणे जमीनीत गाढून घेते जमीन फाडून वर येते आणि सर्वांसाठी ऑक्सीजन निर्माण करते.या बिया सारखे प्रत्येकांनी घडले पाहिजे स्वतःला गाढून घेऊन इतरांसाठी जगण्यासाठी ऑक्सिजन देते.प्रतेकांच्या गरजा आज वाढल्या आहेत सर्व काही मिळालं आणि ऑक्सीजन जर मिळाले नाही तर काय होईल.जीवन जगण्यासाठी आपण निसर्गाची करणी स्विकारतो पण विचार सारणी स्विकारत नाही.आज प्रत्येक जन निसर्गाच्या ऑक्सीजन वर जगतो आमचे संरक्षण निसर्ग करतो परंतू निसर्गाची काळजी घेत नाही.पर्यावरण ही अनेक प्रकारच्या वनस्पती टिकून ठेवतात प्रत्येक अन्न ही वनस्पती निर्माण करते म्हणून प्रत्येक वनस्पती ची काळजी घेतली पाहीजे कारण वनस्पती ही जगाची निर्मिती आहे.वनस्पतीची काळजी घेतली तर त्या ऑक्सीजन निर्माण करु शकतील म्हणून त्यांची काळजी घेणे गरजेची आहे.नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत बी. पी सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.या कार्यक्रमासाठी रेणापूर चाकूर ,उदगीर तालूक्यातील किशोरी मुली उपस्थीत होत्या. सूत्रसंचालन मधुकर गालफाडे, यांनी केले तर आभार धनराज पवार यांनी मानले. वनस्पती निसर्ग निर्माण करते, अन्नधान्य देते डॉ. वाघमारे म्हणाले, वनस्पती निसर्ग निर्माण करते.मानवी जीवन जगण्यासाठी वनस्पती गरजेची आहे.मानवाला अन्नधान्य, ऑक्सीजन,सावली सर्व काही देते परंतू मानवाकडून वनस्पती काहीच घेत नाही.मानवाला मोफत ऑक्सिजन पुरवते.म्हणून मानवाने वनस्पतींचे रक्षण, संरक्षण,केले पाहीजे,थोडीही माती लावली पाहीजे,थोडेसे पाणी दिले पाहिजे,व काळजी घेतली पाहिजे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *