Headlines

नितेश राणेंकडून नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत:म्हणाले- आपण सगळे मूळचे हिंदूच, इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले, मग मुंब्र्याचे 'मुंब्रादेवी' का होऊ नये?




महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ झाल्यानंतर, आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या उपनगराचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ करण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या मुद्दयावर भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. रत्नागिरी येथे ‘तिरंगा यात्रेत’ सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी मुंब्र्याच्या नामांतराचे संकेत दिले. तसेच, त्यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मुंब्र्याच्या नामांतराचे स्पष्ट संकेत मुंब्र्याच्या नामांतराबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, “पहिले आपण सगळे हिंदूच होतो. त्यामुळे पुन्हा हिंदूमय करण्याचे काम आम्ही लोक करत आहोत. जर इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर असे नामकरण करण्यात आले आहे, तर मग मुंब्र्याचे ‘मुंब्रादेवी’ असे नामकरण का होऊ नये?” असे स्पष्ट संकेत देत त्यांनी मुंब्र्याच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आणला आहे. जात पडताळणी- अधिकाऱ्यांवर संताप, जरांगेंना पाठिंबा मराठा आरक्षणांतर्गत जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधला. “प्रशासनात आणि खात्यात काही ‘सडके आंबे’ बसले आहेत. काही अधिकारी जाणीवपूर्वक चुकीचे परवाने देतात किंवा अडवणूक करतात. त्यांच्या या कारभारामुळे सरकारची बदनामी होते.” जरांगेंचा मुद्दा योग्यच मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा चुकीचा नव्हता, तर तो योग्यच होता, असे राणे यांनी स्पष्ट केले. “जात पडताळणीच्या प्रक्रियेत काही मराठा तरुणांना डावलले गेले, हा प्रश्न नक्कीच गंभीर आहे. मात्र, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदार धरणे योग्य नाही. हा प्रकार केवळ खालच्या पातळीवरील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे घडला आहे,” असा दावा राणे यांनी केला. पृथ्वीराज चव्हाणांवर थेट हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी काँग्रेसचे मोठे नुकसान केले. त्यांच्याच त्या चुकीच्या कारभारामुळे काँग्रेस आजही विरोधी पक्षात आहे. त्यामुळे चव्हाण यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.” संजय राऊतांना टोला, हा काय तिथे चहा पाजायला होता का? उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेचाही नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. राऊतांच्या दाव्यांवर बोचरी टीका करताना ते म्हणाले, “हा (संजय राऊत) काय तिथे चहा पाजायला होता का? भारत हा लोकशाही मानणारा देश असून, येथे संविधान, कायदे आणि नियम आहेत.” हेही वाचा… तुकाराम मुंढेंचा धडाका:10 मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA ची धाड; 12 परवाने निलंबित अवघ्या 10 मिनिटांत घरपोच किराणा सामान आणि खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या ‘क्विक कॉमर्स’ प्लॅटफॉर्म्सचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, या सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या ‘डार्क स्टोअर्स’मधून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आता एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात Blinkit, Zepto आणि Instamart या प्रमुख कंपन्यांच्या डार्क स्टोअर्सवर अचानक धाडसत्र राबवण्यात आले. या कारवाईत थेट 12 डार्क स्टोअर्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *