Headlines

चोरी:पोलिस ठाण्यातून होमगार्डच्या पाहुण्याकडूनच लॅपटॉप चोरी




चोऱ्या रोखण्याची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या कार्यालयातूनच चक्क एका पोलिस अधिकाऱ्याचा लॅपटॉप चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार वैराग पोलिस ठाण्यात शुक्रवारी उघडकीस आला. मात्र, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत सीसीटीव्हीच्या आधारे या संशयिताला अवघ्या काही तासांतच वैरागपासून चार किलोमीटर अंतरावरील मानेगाव येथून ताब्यात घेतले. होमगार्डचा पाहुणाच असल्याचे उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून काळेगाव येथे देवाच्या कार्यक्रमासाठी आलेला एक तरुण वैराग पोलिस ठाण्यातील एका होमगार्डचा पाहुणा होता. त्यामुळे त्याला ठाण्यात सहज प्रवेश मिळाला. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याने पोलिस ठाण्यात येऊन पाहणी केली. दरम्यान, उपनिरीक्षकांच्या कार्यालयातील टेबलवर त्याला दोन लॅपटॉप दिसले. तिथे कोणीही नसल्याची संधी साधून त्याने एक लॅपटॉप उचलला आणि शर्टमध्ये लपवून पलायन केले. कामानिमित्त बाहेर गेलेले अधिकारी परतल्यानंतर त्यांना लॅपटॉप चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरीचा हा संपूर्ण प्रकार समोर आला. संशयित मानेगाव येथून घेतले ताब्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढत पोलिसांनी त्याला वैरागपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील मानेगाव येथून ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरांवर अंकुश ठेवणाऱ्या पोलिसांच्या ठाण्यातच चोरी झाल्याने या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *