Headlines

हेरंब प्राथमिक व ज्ञानेश विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा:देशभक्तीपर गीते आणि चिमुकल्यांच्या वेशभूषेने जिंकली उपस्थितांची मने




उन्नती शिक्षण संस्था संचलित हेरंब प्राथमिक विद्यामंदिर व ज्ञानेश विद्यामंदिर माध्यमिक शाळा, सिडको एन–2 येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे अजय वझरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव मीनाक्षीताई विटोरे मॅडम, अध्यक्ष शैलेंद्र विटोरे सर, उपाध्यक्षा श्रीमती पूजा पऱ्हे मॅडम, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री शिवपुरे मॅडम, उपमुख्याध्यापक ए. एच. पंडुरे सर, उपमुख्याध्यापक सुभाष कुंडारे सर, हेरंब प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक परमेश्वर पवार सर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. NCC तसेच स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना शिस्तबद्ध मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाची सुंदर अभिव्यक्ती सादर केली. लावण्या गायकवाड व सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बालवर्गातील चिमुकल्यांनी विविध महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हेरंब प्राथमिक विद्यामंदिरचा विद्यार्थी ओंकार भापकर तसेच ज्ञानेश विद्यामंदिरच्या इयत्ता नववीतील लक्ष्मी पांडे व पृथ्वी गोजरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता सहावीतील माधव गोजरे याने देशभक्तीपर गीत सादर केले. क्रीडा शिक्षक सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर आकर्षक पी.टी. प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर क्रीडा शिक्षक व कला शिक्षकांनी सादर केलेल्या संगीतमय लेझीमने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी लकारे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे अजय वझरकर (चिफ इंजिनिअर क्लास वन फॉरेन गोइंग शिप) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि जबाबदार नागरिकत्व याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुण्या श्रीमती पल्लवी वझरकर (तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर) यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन साक्षी अमोल सोनवणे यांनी केले. नव्या वामन वैद्य यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. राष्ट्रप्रेम, शिस्त, सांस्कृतिक सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे 80 वा स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला. “देशभक्तीची भावना मनामनात जागवित, ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याचा संदेश देत स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *