Headlines

"जोपर्यंत Re-Exam होत नाही, आम्ही इथून जाणार नाही":हायकोर्ट परीक्षेतील गोंधळावरून अभिजीत दिपकेंचा संताप, आंदोलनात सहभागी




छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, अशी भूमिका दिपके यांनी घेतली आहे. अभिजीत दिपके म्हणाले, आज इथे हायकोर्टाची परीक्षा होती. इथे खूप लांबून विद्यार्थी आले होते. ते जेव्हा परीक्षेला बसले तेव्हा त्यांना समजले की इथले कम्प्युटर काम करत नाही करते, तर कोणाची स्क्रीन काम करत नाहीये. विशेष म्हणजे 10 मिनिटांच्या आत लॉग आऊट होत होते. याचा अर्थ सर्व्हरही चांगले काम करत नव्हते. आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले आहे. तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, ही सिस्टम फेल झाली आहे, सरकार फेल झाले आहे. जज जोपर्यंत येऊन गॅरंटी देत नाही आम्ही इथून जाणार नाही पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, या सेंटरवरचे जे आहेत तेच विद्यार्थ्यांना सांगत होते की तुम्हाला कळत नाही का परीक्षा कशी द्यायची. हे विद्यार्थी इतके लांबून आले आहेत. त्यांना आकला नव्हत्या का चांगले पीसी लावायचे, चांगले किबोर्ड लावायचे, सर्व्हर नीट करायचे, स्वतःला अक्कल नाही या सरकारला आणि विद्यार्थ्यांची अक्कल काढत आहेत. मुलांची अशी मागणी आहे की पुन्हा परीक्षा झाली पाहिजे आणि लगेच झाली पाहिजे. जोपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाचे जज बाहेर येऊन लिखितमध्ये गॅरंटी देत नाही तोपर्यंत इथून कोणीच हलणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत इथेच बसून राहणार ऑनलाइन परीक्षा घ्यायची लायकी नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य का खराब करत आहेत? असा संतप्त सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला. तसेच ते म्हणाले, एक परीक्षा दाखवा जिथे व्यवस्थित ऑनलाइन परीक्षा घेतली गेली आहे. जिथे सर्व्हर चांगले असतील, कम्प्युटर चांगले असतील, अशी एक परीक्षा दाखवा. लायकी नाही तुमची तर विद्यार्थ्यांचे भविष्य खराब नका करू. जोपर्यंत या मुलांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी स्वतः इथून हलणार नाही आणि मी या विद्यार्थ्यांसोबत इथेच बसून राहणार आहे, असे दिपके म्हणाले. याच संदर्भातील ही देखील बातमी वाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक परीक्षेचा फज्जा:सर्व्हर डाऊन, किबोर्डही खराब; संतप्त विद्यार्थ्यांचा केंद्राबाहेरच ठिय्या आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा पार पडत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *