Headlines

15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा जमाखर्च जाहीर:साताऱ्यातील बैठकीत संयोजन समितीकडून सादरीकरण




विद्रोही सांस्कृतीक चळवळ, महाराष्ट्र च्या वतीने व 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन समितीचे वतीने दि. 9 व 10 हे रोजी सातारा येथे 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा जमाखर्च संयोजन समिती व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र च्या वतीने सातारा येथे झालेल्या बैठकीत घेऊन जाहीर करण्यात आला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य डॉ भारत पाटणकर व संघटनेचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा जमा खर्च संयोजन समितीच्या वतीने खजिनदार राहुल गंगावणे यांनी सादर केला. संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी प्रास्ताविक करून निधी देणाऱ्या सर्व जणांचे आभार मानले व सक्रिय राहून काम केलेल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. सातारा येथील विद्रोही संमेलनासाठी समाजातील सर्वच थरातून अर्थात विद्यार्थी कार्यकर्ते, प्राध्यापक बंधू भगिनी, वकील, डॉक्टर, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक युवती, विविध क्षेत्रातुन निधी मिळाला. एकूण रोख जमा निधी रुपये १६ ,८४,९३८/- इतका असुन एकुण खर्च रुपये, १६,०५,२६४/- इतका झाला आहे. शिल्लक रक्कम रुपये ७९,६७४/- इतकी आहे. प्रबोधन मिरवणूक, संमेलन, उद्घाटन, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला व शिवराज्याभिषेक अर्थात किरण माने शो ही दोन नाटके तसेच कवी संमेलन, माहितीपटाचे सादरीकरण, लोककलांचे व शाहिरीचे सादरीकरण, विविध विषयावरील परिसंवाद यांनी हे संमेलन चांगले रंगले होते. मंडप उभारणी, जेवण, प्रवास भाडे खर्च, पाहुण्यांची निवास व्यवस्था आदी संयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रथेप्रमाणे याही संमेलनाचा जमा खर्च लोकांसाठी सादर करण्यात आलेला आहे आणि तोही वर्ष संपण्याच्या आत जाहीर केला आहे. असे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. संयोजन समितीच्या या बैठकीला संयोजन समितीचे सेक्रेटरी एडवोकेट राजेंद्र गलांडे, सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद, डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्रा. गौतम काटकर, प्रदीप मोरे, हणमंत सावंत, दिलीप भोसले, शिवाजी भोसले सर, शुभम ढाले, संकेत माने, अमित कांबळे, अस्तिका आगासे, प्रा. हरी पाटील, संतोष गोठल आदी उपस्थित होते. दि. ९ व १० मे २०२६ रोजी साताऱ्यात संपन्न झालेल्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने संमेलनाचा जमा खर्च जनतेसाठी जाहीर करण्यात आलेला आहे आता त्यापूर्वी सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जमा खर्च जाहीर करावा अशी मागणी डॉ भारत पाटणकर व कॉ धनाजी गुरव यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *