Headlines

Maharashtra CM Devendra Fadnavis Gets Power to Overrule Minister Decisions


राज्यात ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित करण्यात आले असून, यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख

.

राज्य सरकारकडून अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमांमुळे मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या कार्यपद्धती व अधिकारांबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, कोणत्याही विभागाच्या प्राथमिक कामकाजाची जबाबदारी ही संबंधित मंत्र्याचीच राहील. मात्र, एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय फिरवताना मुख्यमंत्र्यांना त्याबाबत लेखी स्वरूपात आपली नोंद करावी लागणार आहे.

कागदपत्रे सादर करणे विभागांना बंधनकारक

नव्या नियमांनुसार मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय कामकाजात मोठे अधिकार मिळाले आहेत. मुख्यमंत्री कोणत्याही विभागातील महत्त्वाच्या फाईल्स किंवा कागदपत्रे मागवू शकतात. मुख्यमंत्र्यांनी मागणी केल्यानंतर संबंधित मंत्री तसेच त्या विभागाच्या सचिवांना ती कागदपत्रे मुख्यमंत्र्यांसमोर सादर करणे बंधनकारक असेल, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

महायुतीच्या गोटात राजकीय पडसादांची शक्यता

या निर्णयाचे आता महायुतीच्या राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भविष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे निर्णय बदलल्यास महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या नव्या नियमावलीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हे ही वृत्त वाचा नाशिकमध्ये प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा गळा चिरला:18 तासांनी मृतदेह घाटात फेकला; दोघे ताब्यात, पोलिसांनी कसारा येथून शोधला मृतदेह

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने मित्राच्या साथीने प्रियकराची घरात चाकूने गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी 18 तास मृतदेह घरात ठेवून कारमधून नेत तो कसारा घाटात फेकून दिला. मात्र, गुन्हे शाखा युनिट 1 चे नाझीम पठाण, मुख्तार शेख आणि पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून कार चालकाला ताब्यात घेत मृतदेह शोधला. त्याची ओळखही पटवली. वसंत गोरखनाथ सातपुते (40, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कुठलीही मिसिंग दाखल नसताना हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.