![]()
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात १२ दिवस कारागृहात असलेला संशयित एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला अखेर जामीन मंजूर झाला. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढण्यात आलेल्या अटक वॉरंटमुळे पटेलला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी थेट कारागृहात करण्यात आली होती. तर, मुख्य संशयित दानिश शेख याच्या जामीन अर्जावर २७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा खान हिला पळवून जाण्यास मदत करणे, आश्रय देणे, आरोपीला मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने पटेलला नोटीस बजावली होती. एसआयटीने पटेलची ६ वेळा चौकशी केली. नाशिक रोड न्यायालयात खटला सुरू होता. सुनावणी सुरू असताना न्यायालयाने पटेलला समन्स बजावले होते. मात्र तो न्यायालयात हजर राहिला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या नावे अटक वॉरंट बजावले होते. देवळाली कॅम्प पोलिसांनी पटेलला संभाजीनगर येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने थेट कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर १२ दिवस पटेल कारागृहात होता. दरम्यान, दानिश शेखच्या अर्जावर २७ तारखेला सुनावणी होणार आहे.
Source link
काॅर्पोरेट जिहाद प्रकरण:मतीन पटेलला मिळाला अखेर जामीन, दानिश शेखच्या जामीन अर्जावर आता 27 तारखेला सुनावणी