Headlines

मराठा समाजाने ओबीसीत न येता आरक्षण वाढवण्यासाठी लढावे:कुंभमेळ्याच्या नावाखाली उधळपट्टी अन् भ्रष्टाचार, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप




मनोज जरांगे आणि सरकार एकमेकांना बघून घेतील. सरकारने त्यांच्यासमोर वारंवार गुडघे टेकले आहेत. ते सरकारला झुकवतात की सरकार त्यांना झुकावते हे आम्ही पाहू. कोण कोणाला जाम करते, सरकार कितीवेळा आणि कशामुळे जाम होते हे आम्हाला माहिती आहे, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाही. नोंदी सापडल्या ती शिंदे समीती नेमली कोणी? शिंदे कोण आहेत हे पुढे आले की मराठा कुणबी नोंदी कशा सापडल्या हे समोर येईल. ओबीसी समाजावर घाव घातला जात आहे. ओबीसी मधील 378 जातींमध्ये येऊन तुम्हाला काय मिळणार आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. तुम्ही आमच्यात येऊन केवळ आमचे जे काही आहे ते सर्व काही हिरावून घ्याल, पण तुम्हाला तसे काही मिळणार नाही. त्यामुळे आरक्षण वाढवण्यासाठी जरांगे पाटील यांनी काम केले पाहिजे. 10 टक्के EWS आरक्षण आहे, तर उर्वरित लोकांसाठी 90 टक्के आरक्षण करावे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. कुंभमेळ्यातून पैसे खाण्यासाठी आकडा फुगवला विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील कंत्राटदारांचे 90 हजार कोटी रुपये थकीत आहेत आणि त्यासंदर्भात आज आंदोलन सुरू झाले आहे. सरकारकडून समृद्धी आणि शक्तीपीठासारख्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी सुरू आहे, पण कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नाहीत. कुंभमेळ्यातून पैसे खाण्यासाठी मोठी कंत्राटे काढण्यात येत आहेत. 10 हजार कोटींमध्ये कुंभमेळा होऊ शकतो, पण त्यासाठी अवाढव्य खर्च केला जात आहे. कंत्राटदार आज कर्जबाजारी झाले असून, पैसे नसल्याने त्यांची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे त्यांचे थकीत पैसे आधी दिले गेले पाहिजेत. चि़त्रा वाघ यांच्यावर नाव न घेता टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको, जी भाजपमध्ये आहे, तिने काल राहुल गांधींना ‘रक्तात देशभक्ती असावी लागते’ असे म्हटले. या वेड्या बाईला काय सांगावे की राहुल गांधींच्या आजीचा 36 गोळ्या झेलत मृत्यू झाला, त्यांच्या वडिलांच्या देहाचे तुकडे झाले, ज्यांचे आजोबा 10 ते 12 वर्षे जेलमध्ये होते आणि स्वातंत्र्य मिळावे म्हणून ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलमध्ये गेले, अशा कुटुंबातील व्यक्तीवर भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई टीका करत आहेत. त्यांनी सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न केला असून, ती थुंकी त्यांच्याच तोंडावर पडणार आहे. तरुणांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न आंदोलनातील सहभागाबाबत स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले की, आंदोलनासाठी अनेक लोक जात असतात, त्यांना कोणी विशेष आमंत्रण देऊन बोलवत नाही; ते स्वतःहून सामील होत असतात. ‘तू नक्षलवादी होतास, तू आंदोलनाला ये’ असे कोणी सांगत नाही. तरुणांच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी नवीन कारणे शोधण्याचे हे एक षड्यंत्र आहे. आंदोलनात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला कोणीही स्वतःहून बोलवत नसते, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

हे ही वृत्त वाचा देवेंद्र फडणवीस आता आणखी पॉवरफुल! कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे राज्यात ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित करण्यात आले असून, यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना अत्यंत महत्त्वाचे अधिकार मिळाले असून, मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्यांना थेट हस्तक्षेप करता येणार आहे. या नव्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक हिताच्या बाबींमध्ये मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *