Headlines

राज्यात दीड लाख अमराठी चालकांनी शिकली मराठी:7,750 चालक अनुत्तीर्ण, पुन्हा द्यावी लागेल परीक्षा




राज्य शासनाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान’अंतर्गत महाराष्ट्रातील १.६५ लाखांपेक्षा जास्त अमराठी ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी अनिवार्य मराठी भाषा प्रशिक्षणात नोंदणी केली आहे. या अभियानांतर्गत १ लाख ४० हजार ४२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ७,७५० चालक अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्य परिवहन विभागातर्फे “कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘मुंबई मराठी साहित्य संघ’’ यांच्या सहकार्याने ५९ प्रादेशिक परिवहन कार्यालये, उप-आरटीओ आणि भाषा प्रशिक्षण केंद्रांमध्ये १०५ दिवस हा ४ तासांचा प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आला. मुदतवाढीस परिवहन मंत्र्यांचा विरोध मुंबई महानगर क्षेत्रातील ५.५ लाख चालकांपैकी ७०% चालक बिगर-मराठी भाषक असल्याने “मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सी युनियन’ने १५ ऑगस्टच्या मुदतीत ३ महिन्यांची वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. फेरपरीक्षा व वर्गासाठी ४ केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव अभियानांतर्गत समाविष्ट असलेले अतिरिक्त विद्यार्थी आणि अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांच्यासाठी विशेष वर्ग आयोजित करून त्यांची पुनर्परीक्षा (फेरपरीक्षा) घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. यासाठी एकंदरीत ४ केंद्रे सुरू ठेवण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर सादर करण्यात आला आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषिक अस्मितेला संस्थात्मक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *