देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्र साद घालत आहे. कारण दिल्लीमधील जे कॅबिनेट आहे ते अत्यंत कमकुवत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम कॅबिनेट तयार करायचे आहे, त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ते सहकाऱ्यांना स
.
संजय राऊत म्हणाले की, यशवंतराव चव्हाणापासून तर विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक लोकं महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले आम्ही पाहिले आहेत. दिल्लीत जायचे असेल तर मूळ घर आवरावे लागते, त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो, स्थिरस्थावर करावे लागते, कुटुंबियांची व्यवस्था करावी लागते. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात राहण्याची खूप इच्छा असेल पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना दिल्लीत ढकलत आहेत त्यांचे काय? असा सवाल ही राऊत यांनी केला आहे. अनेकांनी त्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. आम्ही चांगल्या भावनेतून म्हणत आहोत की तुम्ही दिल्लीचे नेतृत्व केले पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्याने राष्ट्राचे नेतृत्च करावे असे आम्हाला वाटते तर त्यांच्यासोबतच्या नेत्यांना कधी ते दिल्लीत जातात आणि कधी त्यांची जागा आपल्याला मिळते असे वाटत आहे.

राष्ट्र फडणवीसांना साद घालतंय
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात तसे काही लोक गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत असतात. त्यांना दिल्लीत घेत आहात तर माझे काही तरी करा असे शहांना सांगत असतात, असा टोला एकनाथ शिंदेंचे नाव न घेता लगावला आहे. त्यांच्यापेक्षा मला दिल्ली जास्त माहिती आहे. फडणवीस जेव्हा म्हणाले की मी पुन्हा येईल तेव्हा ते पुन्हा आले नाही, त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली, 50 कोटींना माणसं विकत घ्यावी लागली. एकनाथ शिंदेंना फोडावे लागले. आम्हाला फडणवीस इथे हवे आहेत पण राष्ट्र त्यांना साद घालत आहे, त्यामुळे आता ते महाराष्ट्रात राहणार नाही.
मंत्रिमंडळ फेरबदलासाठी पंतप्रधानांना एक तासही पुरेसा
संजय राऊत म्हणाले की, मंत्रिमंडळ फेरबदल करण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना एक तासही पुरेसा असतो त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाला आता कोणाला घेता येणार नाही असे नसते त्यासाठी एक तासही पुरेसा असतो, यापूर्वी असे झाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी चांगले काम केले नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देऊन महिनाही पूर्ण झाला नाही, पण तरुणांच्या भावनांचा विचार करावा लागेल. विनोद तावडे यांनी प्रदीर्घ काळ संघटनेचे काम केले आहे. हे ही वृत्त वाचा
देवेंद्र फडणवीस आता आणखी पॉवरफुल! कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे

राज्यात ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित करण्यात आले असून, यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना अत्यंत महत्त्वाचे अधिकार मिळाले असून, मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्यांना थेट हस्तक्षेप करता येणार आहे. या नव्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक हिताच्या बाबींमध्ये मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात. वाचा सविस्तर