Headlines

Parinay Phuke Criticizes Manoj Jarange Over Maratha Reservation Stand


ओबीसींचे आरक्षण कुठेही धोक्यात नाही, कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच कोणत्याही जातीला आरक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही आंदोलनामुळे कोणालाही आरक्षणाच्या यादीत समाविष्ट करता येत नाही. मनोज जरांगे ज्या 58 लाख नोंदी सांगत आहेत, त्यामध्ये आम्ही

.

परिणय फुके पुढे म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत झालेले आंदोलन पाहून मनोज जरांगे पाटील यांना थोडासा उत्साह आला आहे. जरांगे पाटील सरकार आणि राज्याला वेठीस धरण्याची जी भाषा करत आहेत, ती अतिशय चुकीची आहे. आरक्षण हे संविधानाच्या चौकटीतील कायद्यांनुसारच मिळत असते. मनोज जरांगे पाटील यांचे जे सल्लागार आहेत, ते त्यांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत; अशा प्रकारे जोर-जबरदस्तीने आरक्षण मिळत नसते. त्यांनी संविधान आणि आरक्षणासंदर्भात अभ्यास केला पाहिजे.

ही रस्त्यावरची नाही तर कोर्टातील लढाई

जात पडताळणीबाबत बोलताना परिणय फुके म्हणाले की, जात वैधता प्रमाणपत्र हे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसारच दिले गेले पाहिजे. ही रस्त्यावरची नाही तर कोर्टातील लढाई आहे, त्यामुळे त्यांनी चांगले वकील लावून आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. जरांगे यांचे सल्लागार हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेत असतात, म्हणूनच ते अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात.

नक्षलजीवी लोकांकडून देशाची बदनामी

देशाविरोधात काम करणाऱ्या घटकांवर निशाणा साधताना फुके म्हणाले की, परदेशातून निधी घेत आपल्या देशाविरोधात काम करणारे लोक कुठेतरी देशाचे नाव खराब करत आहेत. हे सर्व नक्षलजीवी लोक देशाचे नाव खराब करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच सध्या सुरू असलेल्या कंत्राटदारांच्या आंदोलनाबाबत विचारले असता, त्यांच्या मागण्यांवर हळूहळू तोडगा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे ही वृत्त वाचा मराठा आरक्षण नोंदींचा 58 लाखांचा आकडा फुगवलेला:मराठवाड्यात फक्त 50 हजार नोंदी, अमरावती-नागपूरच्या नोंदी जुन्याच, त्यांचा अन् आंदोलनाचा संबंध नाही- तायवाडे

महाराष्ट्रात 58 लाख कुणबी नोंदी आढळल्याचा दावा करून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यात केवळ 50 हजारांच्या आसपासच नवीन नोंदी सापडल्या आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील नोंदी या पिढ्यानपिढ्या कुणबी दाखले असणाऱ्या लोकांच्याच आहेत, नव्याने कोणीही आलेले नाही, असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.