Headlines

भाजपचा ‘वन नेशन, वन पार्टी’चा छुपा डाव:पेपरफुटी, परीक्षा आणि पक्षफोडीवरून हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल




स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचा काडीचाही सहभाग नव्हता, त्यांनी आम्हाला देशभक्ती आणि ‘वंदे मातरम’चे धडे देऊ नयेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आधी स्वतःच्या शाखांमध्ये ‘वंदे मातरम’ गाण्यास सुरुवात करावी, असे थेट आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आगामी ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पुण्यात पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. पुण्यात राहुल गांधींचा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ हे देशव्यापी अभियान सुरू केले आहे. कोटा, डेहराडून आणि प्रयागराज येथील कार्यक्रमानंतर आता महाराष्ट्रात पुण्याच्या एसएसपीएम (SSPM) मैदानावर २२ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्मभूमीत होणाऱ्या या कार्यक्रमाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि रेहाना चिश्ती उपस्थित होते. ‘वन नेशन, वन पार्टी’चा भाजपचा डाव सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि परीक्षांमधील गैरप्रकारांवर बोलताना सपकाळ म्हणाले की, २०१४ पासून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने बहुजनांचे अधिकार हिरावून घेण्याचा सपाटा लावला आहे. व्यापम घोटाळ्यापासून ते अलीकडच्या नीट (NEET), टीईटी (TET) आणि न्यायालयातील भरती परीक्षांपर्यंत सर्वच परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. गेल्या १२ वर्षांत तब्बल १५४ वेळा पेपर फुटले आहेत. संसदेत यावर चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी मोदी-शहा यांनी धुडकावून लावली. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या नावाखाली विशिष्ट वर्गाला संधी देत आणि पैशांच्या जोरावर पक्ष फोडत देशात ‘वन नेशन, वन पार्टी’ निर्माण करण्याचा भाजपचा छुपा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भागवतांचा कार्यक्रम म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’ सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘जेन झी’ (Gen Z) पिढीतील तरुणांसोबत केलेल्या संवादावरही सपकाळ यांनी निशाणा साधला. भागवतांचा तो कार्यक्रम केवळ निवडक मुलांसाठी आयोजित केलेला एक ‘मॅच फिक्सिंग’ प्रकार होता. मात्र, काँग्रेसचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तिथे कुणाला पाठवायचे असेल तर त्यांनी खुशाल पाठवावे, असा टोला त्यांनी लगावला. फडणवीसांसारख्या उच्चशिक्षित नेत्याची टीका केवळ अज्ञानातून आलेली आहे. तरुणांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्या भीतीतूनच त्यांना आता तिरंगा यात्रा काढावी लागत आहे, असेही ते म्हणाले. संघाने ५० वर्षे तिरंगा फडकावला नाही भाजपकडून सातत्याने उपस्थित केल्या जाणाऱ्या ‘वंदे मातरम’च्या मुद्द्याला उत्तर देताना सपकाळ यांनी संघाच्या इतिहासावर बोट ठेवले. ते म्हणाले, “ज्या आरएसएसने ५० वर्षे स्वतःच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही आणि ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी काडीमात्र संबंध नाही, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. काँग्रेस पक्ष गेल्या ९० वर्षांपासून ‘वंदे मातरम’ गात आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांनी जे निश्चित केले, तेच काँग्रेस पुढे नेत आहे.” त्यामुळे इतरांवर टीका करण्यापेक्षा संघाने आधी आपल्या शाखांमध्ये ‘वंदे मातरम’ सुरू करावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले. हेही वाचा.. तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय: राज्यात आजपासून सुटे तेल विक्रीवर पूर्णपणे बंदी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई दूध आणि अन्य अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई केल्यानंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यतेल विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे तेल आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात सुटे खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, राज्यातील कोणत्याही दुकानदाराला सुटे खाद्यतेल विकता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करून सुट्टे तेल विक्री सुरू ठेवल्यास संबंधित विक्रेत्यांवर FDAकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे खाद्यतेल विक्रेत्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *