![]()
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी प्रवक्ते राम माधव यांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या (ISI) निवृत्त अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा अत्यंत खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या भेटीत चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगत, आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनाच जाब विचारला आहे. आंबेडकरांच्या या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीलंकेत गुप्त भेट आणि ४ मुद्दे प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत हा दावा केला आहे. ते म्हणाले, “गेल्या काही महिन्यांत आरएसएसचे माजी प्रवक्ते राम माधव यांनी श्रीलंकेत जाऊन पाकिस्तानच्या आयएसआयच्या (ISI) काही निवृत्त अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आमच्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान एकूण चार मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. हे चार मुद्दे नेमके कोणते होते? याचा खुलासा आता आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देशासमोर केला पाहिजे.” पंतप्रधान मोदींनी अधिकार दिले होते का? या भेटीच्या अधिकृततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंबेडकरांनी थेट पंतप्रधानांना लक्ष केले. “देशाला ‘मन की बात’ सांगणाऱ्या पंतप्रधान मोदींनी आरएसएस आणि राम माधव यांना आयएसआयचे पदाधिकारी किंवा परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणी करण्याचे अधिकार दिले होते का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विरोधी पक्षांच्या मौनावर तीव्र संताप सत्तेत असलेल्या भाजप आणि आरएसएसवर टीका करतानाच आंबेडकरांनी मुख्य विरोधी पक्षांनाही धारेवर धरले. “या देशातील विरोधी पक्षांचे हे मोठे दुर्दैव आहे की, राज्याचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते भारतीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या राम माधव यांच्या या भेटीबाबत कोणताही प्रश्न उपस्थित करताना दिसत नाहीत. प्रस्थापित विरोधी पक्ष गप्प असल्याने आता वंचित बहुजन आघाडीला हे राष्ट्रीय प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नागरिकांना केले आवाहन राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित या महत्त्वाच्या विषयावर जनतेनेही आवाज उठवावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. “लोकांनी आता सार्वजनिक ठिकाणी या विषयावर उघडपणे चर्चा करावी आणि सरकारला थेट जाब विचारावा,” असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यावर आता भाजप, आरएसएस किंवा महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. हेही वाचा.. पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी राडा:ABVP-NSUI भिडले; विरोधकांकडून भाडोत्री गुंडांचा वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात काँग्रेस-एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी व धक्काबुक्की झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सविस्तर वाचा
Source link
राम माधव यांच्या कथित भेटीवर प्रकाश आंबेडकरांचा दावा:ISIच्या निवृत्त अधिकाऱ्यांशी श्रीलंकेत चर्चा, चार मुद्दे कोणते?