Headlines

चिंचोली भोसेत अवैध वाळू उपशावर कारवाईस गेलेल्या पोलिसांवर हल्ला:पाच ट्रॅक्टर, जेसीबीसह 53 लाखांचा मुद्देमाल जप्त, 14 जणांविरोधात गुन्हा‎



पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भीमा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वाळूमाफियांनी पोलिस कर्मचाऱ्यास घेरून मारहाण केली. तू मला ओळखत नाही का? तुला लय माज आला आहे का? हा माझा ट्रॅक्टर आहे, असे म्हण

.

या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादीनुसार, चिंचोली भोसे हद्दीत वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानुसार शनिवारी (दि. २२) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांचे पथक चिंचोली भोसे येथील भीमा नदी पात्राजवळ कारवाईसाठी गेले होते. पोलिस पथकाने वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर अडवला असता चालकाने उडी मारून पळ काढला.

या घटनेनंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून नदीपात्रात छापा टाकला आणि बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणारी पाच ट्रॅक्टर, पाच ट्रेलर, एक जेसीबी, पाच ब्रास वाळू असा एकूण ५३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच या प्रकरणी बालाजी पवार, अनिल पवार, लहू कारंडे, आबा कारंडे, प्रदीप उर्फ बाळू पवार, सूरज शिंदे, रेवन पवार, अक्षय पवार, शंकर नवगिरे, गणेश सोनवणे, किशोर आवटे, सतीश भुई, करण नाईकवणरे, बबलू नवगिरे (सर्वजण रा. चिंचोली भोसे, भटुंबरे, ता. पंढरपूर) या १४ आरोपींवर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस कर्मचारी नदीपात्रात पाहणी करण्यासाठी गेले असता, ट्रॅक्टरजवळ एकटे असलेल्या पोलिसाला आरोपी बालाजी पवार आणि त्याच्या साथीदारांनी घेरले. “तू मला ओळखत नाही का, तुला लय माज आला आहे का, हा माझा ट्रॅक्टर आहे, असे म्हणत बालाजी पवार याने काठीने मारहाण केली. तसेच इतर साथीदारांनी मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणून १ ब्रास वाळूने भरलेला पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉली जबरदस्तीने पळवून नेली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *