![]()
भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून, संस्कारयुक्त शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि आधुनिक शिक्षणाच्या संधी उप
.
मातोश्री लक्ष्मीबाई पाटील कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांचे अध्यक्षतेखाली तर शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांच्या हस्ते रविवारी (दि. २३) मोहोळ येथे घेण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी सभापती असलम चौधरी, उपसभापती उलका पाटील उपस्थित होते. यामध्ये एकूण १६ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी राजन पाटील म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजाचा आरसा असतो. मात्र समाजाला दिशा,संस्कारासह मूल्यांची शिकवण देणारा गुरू हा त्याहूनही सर्वोच्च स्तंभ आहे. क्षेत्रामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.जगामध्ये शिक्षणाचा दर्जा आणि संस्कार यांचा उत्तम संगम पाहायला मिळत असेल,तर तो भारतातच पाहायला मिळतो. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती जगनाथ कोल्हाळ, जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, बालाजी नरुटे, नगरसेवक प्रमोद डोके, शिक्षक नेते कादे, राजकुमार पाटील, तुकाराम मस्के,सुरेश पवार,राजन सावंत, शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रनिहाय पुरस्कार मिळालेले शिक्षक अंकोली : भाग्यश्री पवार. जि.प.प्रा.शाळा शेजबाभूळगाव कामती बु. : पूजा मैत्रे, जि.प. शाळा पाटीलवस्ती, कोरवली मोहोळ : हेमलता होटकर, जि.प. शाळा समर्थनगर, मोहोळ पोखरापूर : दत्तात्रय नागणे, जि.प.प्रा.शाळा सारोळे पेनूर : समीना बागवान, जि.प.प्रा.शाळा पेनूर इंचगाव : कालिदास मुंडे, जि.प.प्रा.शाळा अरबळी देवडी : बाळासाहेब शेळके, जि.प.प्रा.शाळा देवडी नरखेड : प्रतिभा कांबळे, जि.प.प्रा.शाळा खरकटणे वडवळ : मनीषा थोरात, जि.प.प्रा.शाळा ढोकबाभूळगाव खुनेश्वर : जुनैद मुलाणी, जि.प.प्रा. शाळा मसले चौधरी कोन्हेरी : अनिल पांढरे, जि.प.प्रा. शाळा इंगोले वस्ती शेटफळ : सुरेखा तोरवी, जि.प.प्रा. शाळा शेटफळ सावळेश्वर : तानाजी धावणे, जि.प.प्रा. शाळा सावळेश्वर अनगर : बबन मोरे, जि.प.प्रा. शाळा सलगरवस्ती कुरुल : अश्विनी पाटील, जि.प.प्रा. शाळा दादपूर मोहोळ शिक्षण विभाग कार्यालय : सुरेखा कांबळे.