Headlines

शेतमालाला खर्चाच्या 50 टक्के जादा हमी भाव द्या:लेबर कोड बिल रद्द करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची “बदलाव जरुरी” जनजागरण माेहीम‎



शेतमालाला खर्चाच्या ५० टक्के जादा हमीभाव द्या. लेबर कोड बिल रद्द करा. यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ‘बदलाव जरुरी’ जनजागरण मोहीम सुरू केली आहे. अकोट तालुक्यात भाकपच्या मोहिमेत जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या लाव

.

यंदा आधीच खूप कमी पाऊस पडला आहे. आता तर २३ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद यांसह कापूस, तूर व इतर पिके सुकत आहेत. पाण्याचा मोठा ताण निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाकपकडून ‘बदलाव जरुरी’ जनजागरण मोहिमेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आग्रह धरण्यात येत आहे. जनजागरण यात्रेत कॉ. नयन गायकवाड (राज्य कौन्सिल), कॉ. शाहीर धम्मा खडसे, कॉ. मंगल आढावू, कॉ. सतीश शिंदे, कॉ. चित्रा तेलगोटे, कॉ. उषा ठाकरे, कॉ. अलका तिडके, कॉ. हेमलता सपकाळ, कॉ. किरण तेलगोटे, कॉ. वर्षा माकोडे, कॉ. अष्टशिला सिरसाट, कॉ. वनिता गावंडे, मैना सोनोने, कॉ. विजया रायबोले, कॉ. रेखा आवारे, सुषमा पळसपगार, कॉ. उषा पळसपगार, कॉ. वंदना शेगोकार यांच्यासह आयटक, किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी चारही कामगार कायद्यांच्या संहिता रद्द करण्यात याव्यात. अंगणवाडी, आशा व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घोषित करा. केंद्र सरकारने कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, शेतकरी, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्यासाठी २६ हजार किमान वेतन करावे. निवृत्ती वेतन किमान ९ हजार देण्यात यावे. महागाई कमी करा. शिक्षण दर्जेदार द्या. बेरोजगारी संपवा. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा आदी मागण्या करण्यात आल्या.

युवकांनी मांडली व्यथा शिवाजी महाराज सभागृह येथे सभा पार पडली. सभेत व जनजागरण यात्रेत कॉ. धम्मा खडसे यांनी शाहिरीतून जनतेच्या व्यथा मांडल्या. त्यांनी अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, शेतकरी, कामगार, कर्मचारी, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडल्या. यानंतर कॉ. नयन गायकवाड, कॉ. मंगला आढावू, कॉ. वर्षा माकोडे, कॉ. चित्रा तेलगोटे, कॉ. हेमलता साबळे यांची भाषणे झाली. यात्रेत ‘केंद्र सरकार में बदलाव जरुरी है’, ‘चलो दिल्ली’ असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परिसर दणाणून सोडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *