Headlines

दर्यापुरातील दरोडेखोरांच्या शोधात ग्रामीण पोलिस आता चौथ्या राज्यात:दोन दरोडेखोर सापडले; मात्र उर्वरित तिघांनी आणले पोलिसांच्या नाकी नऊ‎



दर्यापुरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात ३१ जुलैला पाच दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकला होता. या वेळी दरोडेखोरांनी ४११ ग्रॅम सोन्यासह पाच किलो चांदी लंपास केली होती. या प्रकरणाचा २३ दिवसांपासून ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांना दोन

.

दर्यापुरातील माहोरे ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून ३१ जुलैला रात्री आठ वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या दरोडेखोरांचा शोध घेत आहे. पोलिसांनी यापूर्वी एका दरोडेखोराला खामगाव परिसरातून, तर दुसऱ्याला आठ दिवसांपूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पाठलाग करून पकडले होते.या दोन दरोडेखोरांना पकडल्यानंतर उर्वरित तिघांनाही ग्रामीण पोलिस पकडतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, त्या तिघांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले . घटनेला २३ दिवस उलटूनही एलसीबीचे पोलिस या तीन दरोडेखोरांच्या जवळ पोहोचू शकलेले नाहीत. यापूर्वी पोलिसांचे पथक गुजरातसह दोन राज्यांत जाऊन आले. मात्र, पोलिसांचा त्या राज्यात प्रवेश होताच दरोडेखोर दुसऱ्या ठिकाणी पसार होत असल्याचे समोर आले. त्यामुळे २३ दिवसांपासून ग्रामीण पोलिस, या दरोडेखोरांमध्ये लपंडाव सुरू आहे. तो कधी थांबणार उर्वरित दरोडेखोर पोलिसांच्या कधी हातात येणार, हे अद्याप कोडं आहे.

चोरी-दरोड्यांचा तपास पोलिसांसाठी आव्हान १४ ते १५ महिन्यांत चोरट्यांनी , दरोडेखोरांनी दर्यापुरातील चार ज्वेलर्सना लक्ष्य केले. यापैकी दोन ज्वेलर्समध्ये चोऱ्या झाल्या, तर एका ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न केला होता. ३१ जुलैला माहोरे ज्वेलर्समध्ये सशस्त्र दरोडा पडला. या चार घटनांपैकी एकाही चोरी, दरोड्याचा शंभर टक्के तपास करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलेले नाही. गत वर्षी एका ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी काही चोरट्यांना अटक केली होती. मात्र, त्यांच्याकडूनही संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले नाही. तसेच, चोरीचा प्रयत्न करणारी टोळी आणि एका ठिकाणी ज्वेलर्समधील दागिने लंपास करणारी चोरट्यांची टोळी अद्यापही पोलिसांना सापडलेली नाही. त्याचप्रमाणे, माहोरे ज्वेलर्समधील दोन दरोडेखोर सापडले असले तरी उर्वरित तिघांचा अद्याप २३ दिवसांनंतरही पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *