![]()
राज्यातील हजारो मराठी रिक्षाचालक जे सामान्य कुटुंबातील आहेत; ज्यांना नगरसेवक, आमदार किंवा मुख्यमंत्री होता येत नाही, ते रिक्षा चालवून आपले पोट भरतात. रॅपिडो बाइक अॅपने या हजारो रिक्षाचालकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे मराठी भाषेची सक्ती करायची आणि दुसरीकडे दुचाकी टॅक्सीच्या नावाने मराठी रिक्षाचालकांची रोजीरोटी हिरावून घ्यायची, असा कारभार सुरू आहे. मी यासंदर्भात भेटीसाठी वेळ मागितली आहे. रॅपिडोने अनेक मंत्र्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत, तसेच काही मंत्र्यांना निवडणुकीसाठी निधी दिलेला आहे; म्हणूनच ही परतफेड केली जात आहे का? असा थेट सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले की, रिक्षाचालकांसाठी तुम्ही कॅबिनेटमध्ये बंड का करत नाही? तुमच्यावर दिल्लीतील ‘चहावाल्या’चा दबाव आहे का? असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे, मग ती व्यक्ती कोणीही असो. मराठीचा कायदा सर्वांसाठी समान असावा असे अखिलेश यादव यांचेही म्हणणे आहे. फडणवीसांचा अभ्यास कमी पडतोय संजय राऊत पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या महिला धोरणावर टीका करणाऱ्यांनी ‘महिला आरक्षणाबाबत दुटप्पी कोण?’ हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे, त्यांचा अभ्यास कमी पडत आहे. महिला आरक्षणाला कोणीही विरोध केलेला नाही. भाजपकडून महिला आरक्षणासंदर्भात केवळ ढोंग केले जात आहे. 2023 मध्येच महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले होते; त्यावर फडणवीस यांनी पोस्ट करून सरकारचे आभारही मानले होते. तेच विधेयक पुन्हा आणून सत्ताधारी कोणाला मूर्ख बनवत आहेत? एकदा पास झालेले बिल पुन्हा का? संजय राऊत म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकात सरकारने ‘डीलिमिटेशन’ कलम घुसवले आहे. हे नियमांच्या विरोधात असल्याने ते विधेयक कसे पास होणार? सत्ताधारी खोटे का बोलत आहेत? महिला आरक्षणाचे विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले आहे, मग आता पुन्हा हे विधेयक कसे पास होणार? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. नागपुरात पेढे वाटण्याचे काम काल ‘वेड्यां’कडून सुरू होते. ते महिला आरक्षणाच्या विधेयकासंदर्भात खोटारडेपणा करत आहेत, असा टोला राऊतांनी फडणवीस आणि भाजपला लगावला. फडणवीस सुडाने वागताय संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये चहा विकत असल्याचा दावा करतात; पण तेव्हा तिथे स्टेशनच नव्हते, ते केवळ दंतकथा सांगत असतात. मोदींचे जुने फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते अनेक देशांत फिरताना दिसत आहेत. ज्यांचा जन्मच झाला नाही, असे अवतारी पुरुष चहा कसे विकतील? राजकारणात अनेक जण सामान्य घरातून आले आहेत. तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले, तर तुम्ही जनतेचे आभार मानायला हवेत; पण तुम्ही सुडाने वागत आहात, असा टोला राऊतांनी फडणवीस यांना लगावला.सामान्य घरात जन्माला येणारा माणूस असा वागत नाही. अमरावतीमधील घटनेसाठी राहुल गांधींना दोषी ठरवणार का? संजय राऊत म्हणाले की, अमरावतीमध्ये ज्या बालकांचा मृत्यू झाला, तो राहुल गांधींमुळे झाला असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणणार आहेत का? की पंडित नेहरूंमुळे झाला असे म्हणणार आहेत? असा सवाल करत, राज्यातील एकही खाते व्यवस्थित चालत नाही, असा टोला त्यांनी फडणवीस सरकारला लगावला. लोकांचे मृत्यू होत आहेत आणि तुम्ही राहुल गांधींशी स्पर्धा करत आहात; पण आता राहुल गांधी खूप पुढे निघून गेले आहेत. हे ही वृत्त वाचा
अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग:3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. वाचा सविस्तर
Source link