Headlines

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी:कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी जमा




राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना तब्बल 5 हजार 86 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांना 5 हजार 29 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता. त्यामुळे दोन टप्प्यांत आतापर्यंत 12 लाख 58 हजार 243 शेतकऱ्यांना एकूण 10 हजार 115 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत एकूण 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे नियोजन आहे. यामध्ये 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार असून, 23 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी सरकारकडून सुमारे 40 हजार 980 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शेतकऱ्यांसाठी ‘ही’ अट बंधनकारक राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ खात्यात जमा होण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ प्रणालीवर नोंदणी करणे आणि आपले ‘आधार प्रमाणीकरण’ (Aadhaar Authentication/e-KYC) पूर्ण करणे अत्यंत बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आली आहेत, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सरकारच्या निर्णयानंतर आंदोलनांना यश विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विविध शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी आंदोलन आणि उपोषणे केली. सरकारने 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली. सुरुवातीला काही अटी आणि कर्जाच्या मर्यादेबाबत नियम निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने त्यात बदल करत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा.. आमदार-खासदार फोडायला रातोरात खोके जातात:मग कर्जमाफीला विलंब का? रोहित पवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “आमदार आणि खासदार फोडताना रातोरात पैशांचे खोके पाठवले जातात, मात्र जेव्हा विषय अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा येतो, तेव्हाच सरकारला विलंब का होतो?” असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भात एक सविस्तर पोस्ट करत सरकारच्या संथ कारभाराचे वाभाडे काढले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *