Headlines

उंच इमारतींच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञानाला पेटंट:जमिनीचा दाब नियंत्रित करणाऱ्या 'उंच संरक्षक भिंती'च्या पद्धतीला मंजुरी




उंच इमारतींच्या बांधकामात जमिनीचा दाब नियंत्रित करून बांधकामाची सुरक्षितता वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘उंच संरक्षक भिंत आणि तिच्या बांधकामाची पद्धत’ या अभिनव संकल्पनेला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर झाले आहे. या संशोधनाचे पेटंटधारक म्हणून मल्हार विकास पाटील आणि वैशाली विकास पाटील यांची नोंद करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने जारी केलेल्या प्रमाणपत्रानुसार या शोधाला ६००१४७ हा पेटंट क्रमांक देण्यात आला आहे. पेटंट कायद्यातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकतेच या पेटंटला मंजुरी देण्यात आली. उंच बांधकामांसाठी महत्त्वपूर्ण तंत्र जमीन, माती किंवा भरावाचा दाब नियंत्रित ठेवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या संरचनेला संरक्षक भिंत म्हटले जाते. उंच इमारती, उताराची जमीन, खोल पाया, तळघर तसेच विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये अशा भिंतींना महत्त्व असते. वाढत्या शहरीकरणामुळे मर्यादित जागेत उंच इमारती उभारण्याचे प्रमाण वाढत असताना जमिनीची स्थिरता आणि बांधकामाची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर उंच संरक्षक भिंत आणि तिच्या बांधकामाची पद्धत यासंदर्भातील या संशोधनाला मिळालेले पेटंट बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पेटंटमुळे या विशिष्ट संकल्पनेला तसेच तिच्या बांधकाम पद्धतीला बौद्धिक संपदा संरक्षण मिळाले आहे. २० वर्षांसाठी पेटंट संरक्षण पेटंट प्रमाणपत्रातील नोंदीनुसार या शोधासाठी ५ ऑगस्ट २०२३ पासून २० वर्षांचा पेटंट संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पेटंट मंजूर झाल्यामुळे पेटंटधारकांना या शोधाच्या वापराबाबत पेटंट कायद्यानुसार अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे भविष्यात या तंत्रज्ञानाचा बांधकाम क्षेत्रात वापर, त्यामध्ये पुढील विकास तसेच व्यावसायिक विस्तार करण्यासाठी या पेटंटला विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *