Headlines

साईनामाचा गजर अन्‌ सच्चरित्राचे पठण; केडगावात भक्तीचा उत्सव:श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर‎



केडगावच्या बँक कॉलनी परिसरातील श्री साईबाबा मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त यंदा धार्मिकतेसोबतच सामाजिक उपक्रमांचीही पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. काकड आरती, दुग्धाभिषेक, महापूजा, साई सच्चरित्र पारायण, मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरासह ३

.

सोमवारी, २५ ऑगस्ट रोजी राजू सातपुते यांच्या हस्ते श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे विधिवत पूजन करून कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. श्री साई खिचडी परिवार, राहुरीचे श्रीनिवास सहदेव यांच्या वाणीतून साई सच्चरित्र पारायणाचे वाचन होणार आहे. पारायणासाठी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होत असून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

वर्धापन दिनानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकड आरती, दुग्धाभिषेक, महापूजा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरही घेण्यात येणार आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याने परिसराला भक्तिमय झळाळी मिळणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी श्री साईबाबांच्या पालखी व पादुकांची शाहूनगर तसेच संपूर्ण केडगाव परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. साईनामाच्या जयघोषात निघणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने साईभक्त सहभागी होणार आहेत. १ सप्टेंबर रोजी शिर्डी येथील श्री साई कथाकार माधुरीताई शिंदे यांचे प्रवचन होणार आहे. याच दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते मध्यान्ह आरती करण्यात येणार असून, भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचा लाभ केडगाव परिसरासह नगर शहरातील साईभक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रमुख आकर्षण { ३१ ऑगस्ट : साई पालखी व पादुकांची भव्य मिरवणूक { १ सप्टेंबर : माधुरीताई शिंदे यांचे प्रवचन, मध्यान्ह आरती व महाप्रसाद { विशेष : मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *