Headlines

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे काळाची गरज:अकोल्यात विविध उपक्रमांचे आयोजन; 16 विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्याची संधी‎



राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधकवृत्ती विकसित करण्यासाठी विज्ञानविषयक विविध स्पर्धा, कार्यशाळा व उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन अक

.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था (नागपूर), माध्यमिक शिक्षण विभाग (जिल्हा परिषद, अकोला), जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, कुतूहल संस्कार केंद्र आणि आरडीजी पब्लिक स्कूल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय अंतरिक्ष दिना’चे औचित्य साधून भव्य विज्ञान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांच्या विशेष सूचनेनुसार आणि इस्रोचे अधिकृत एज्युकेटर डॉ. नितीन ओक तसेच डॉ. रवींद्र भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० गुणांची विशेष लेखी परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी गुणवत्तेच्या आधारे १६ विद्यार्थ्यांची अंतिम ‘प्रश्नमंजुषा फेरी’साठी निवड करण्यात आली. या अंतिम फेरीतील विजेत्या भाग्यवान विद्यार्थ्यांना थेट इस्रो सायन्स सेंटर आणि विक्रम साराभाई अणूविज्ञान केंद्राच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यावर जाण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या मुख्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कुरियचन सी. पी. हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव, उपप्राचार्य श्वेता चौमवाल, डॉ. नितीन ओक व डॉ. रवींद्र भास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. समारोपीय सत्रात उपशिक्षणाधिकारी प्रमोद टेकाडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला घुंगड व विलास घुंगड यांनी केले. तर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुरलीधर थोरात,ओ. रा. चक्रे, यांच्यासह आरडीजी पब्लिक स्कूलच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडला. यादरम्यान मान्यवरांनी मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *