Headlines

इको फ्रेंडली मूर्तीत लालबागचा राजा, बालगणेशची विविध रूपे:शाडू मातीसोबतच यंदा ‘पेपर मॅश’ गणेशमूर्तींना भाविकांची मिळतेय सर्वाधिक पसंती‎




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारपेठेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मोठी विविधता पाहायला मिळत आहे. पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तींसोबतच यंदा ‘पेपर मॅश’ (कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या) मूर्ती हे मुख्य आकर्षण ठरत आहेत. ९ इंचापासून ते अगदी अडीच फुटांपर्यंतच्या आकारांत या मूर्ती उपलब्ध आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारात पद्मासन, लालबागचा राजा, बालगणेश, दगडूशेठ अशा जवळपास १० हून अधिक आकर्षक रुपांमधील पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा समावेश आहे. काही मूर्तींवर पारंपरिक जलरंग (वॉटर बेस कलर), ड्रेपरी आणि डायमंड वर्कचे सुंदर काम करण्यात आले आहे. शाडू मातीच्या तुलनेत ‘पेपर मॅश’ मूर्तींचे वजन जवळपास ५० टक्के कमी असते. त्यामुळे त्या हाताळणे अत्यंत सोपे जाते. शिवाय, अडीच फुटांची पेपर मॅश मूर्ती विरघळायला कमाल ३ ते साडेतीन तास लागतात, तर तेवढ्याच आकाराची शाडू मातीची मूर्ती विरघळायला साडेपाच ते सहा तास लागतात. याउलट, लहान (९ इंचाची) मूर्ती अवघ्या २० मिनिटांत विरघळते. घरगुती उत्सवासाठी दोन ते अडीच फुटांपर्यंतच्या या पर्यावरणपूरक मूर्तींना अहिल्यानगरमधील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपण उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. नागरिकांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर जागृती झाली असून ते आवर्जून या सात्विक व पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी करत असल्याचे शाडू मूर्तीचे विक्रेते विजय बोकणकर यांनी सांगितले. असे आहेत पर्यावरणपूरक मूर्तींचे दर पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे दर हे आकारानुसार वेगवेगळे आहेत. कल्याण रोड परिसरात पेण येथून विक्रीसाठी आलेल्या मूर्तींमध्ये ९ इंचाची बालगणेश मूर्ती ७५१ रुपये, तर १२ इंचाची (१ फूट) पद्मासन वा दगडूशेठ मूर्ती ९५१ रुपयांना आहे. १४ इंचाच्या नवीन डिझाईनच्या मूर्ती १५०१, तर १६ ते १७ इंचाच्या मध्यम मूर्ती २१०० ते २२०० दरम्यान मिळत आहे. १८ ते २२ इंचाच्या (१.५ ते २ फूट) मूर्ती ३१०० ते ३७०० पर्यंत असून अडीच फुटांची कॉर्पोरेट मूर्ती ६५०० रुपयांना उपलब्ध आहे. ड्रेपरी सजावटीसाठी १००० अतिरिक्त शुल्क आहे. बाप्पाच्या डोळ्यातील भाव महत्त्वाचा असतो ^गणपती बाप्पाच्या मूर्तीची निवड करताना त्यांच्या डोळ्यांतील भाव आणि प्रसन्नता खूप महत्त्वाची असते. १० दिवस आपण बाप्पाची पूजा करतो, त्यामुळे ती शांतता मूर्तीमध्ये दिसली पाहिजे. आम्ही दरवर्षी पूर्णपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो. घरच्या सजावटीसाठी कृत्रिम फुलांऐवजी ताजी फुले वापरतो.’ – कुंती मिरगणे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *