![]()
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील माहीम येथे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या लहान मुलांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत अनोख्या आणि भावनिक पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. उपचारांच्या वेदनेतही काही काळ विरंगुळा मिळावा आणि मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही हजेरी लावली आणि चिमुकल्यांसोबत हा उत्सव साजरा केला. स्वतःच्या हाताने बनवल्या राख्या या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाच्या माध्यमातून केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचीच नव्हे, तर काळजी, आपुलकी आणि एकजुटीची भावनाही जपण्यात आली. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, उपचार घेत असलेल्या या लहानग्यांनी स्वतःच्या हाताने राख्या बनवल्या होत्या. या सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळालेल्या आनंदाच्या क्षणांमुळे उपचारांच्या तणावामधून मुलांना काही काळ मोठा विरंगुळा मिळाला. महापौरांच्या भेटीने कुटुंबीयांना दिलासा महापौर रितू तावडे यांनी स्वतः उपस्थित राहून तेथील मुलांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत रक्षाबंधन साजरे केल्यामुळे हा सर्वांसाठीच एक संस्मरणीय अनुभव ठरला. त्यांच्या या भेटीमुळे आणि संवादामुळे उपचारांच्या या अत्यंत आव्हानात्मक प्रवासात कुटुंबीयांना आपुलकीची आणि आधाराची भावना मिळाली. रुग्णांच्या कुटुंबीयांना मिळतो मोठा आधार दुर्धर आजारावर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असणाऱ्या अनेक लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना अनेकदा मूळ गावापासून शेकडो किलोमीटर दूर यावे लागते. उपचाराचा खर्च आणि प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. अशा वेळी, माहीममधील एका संस्थेमार्फत या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राहण्याची, खाण्याची आणि रुग्णालयात ये-जा करण्याची मोफत सोय उपलब्ध करून दिली जाते. घरापासून दूर राहिल्यामुळे येणारा भावनिक ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या उत्सवांचे आयोजन करून त्यांना सुरक्षित आणि कुटुंबकेंद्री वातावरण देण्याचा प्रयत्न केला जातो. या सकारात्मक वातावरणामुळे कुटुंबांना त्यांच्या मुलाच्या उपचारांवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. हेही वाचा.. तू कुठूनतरी येशील आणि राखी बांधून घेशील…:रक्षाबंधनाला अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भावुक, रोहित पवार म्हणाले- हजारो बहिणी कुणाला राखी बांधणार? राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावर्षी २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाला आज बरोबर ७ महिने पूर्ण होत आहेत. आज देशभरात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र आपल्या लाडक्या भावाची, ‘अजितदादा’ची आठवण आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. सविस्तर वाचा
Source link
उपचारांच्या वेदनेतही राखीचा आनंद:माहीममध्ये कर्करोगग्रस्त चिमुकल्यांचे अनोखे रक्षाबंधन, महापौर रितू तावडेंचाही सहभाग