![]()
माळशिरस तालुक्यासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा. तसेच काही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिला हप्ता अद्याप दिला नसेल तर तोही तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक
.
यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, भाळवणी, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, गुरसाळे, विजय शुगर फॅक्टरी, करकंब, या साखर कारखान्याच्या व्यवस्थापनासही निवेदन देण्यात आले. यंदा रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरीचा उत्पादन खर्च वाढल्याने दुस-या हप्त्याची मागणी केली आहे. यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे नेते दीपक भोसले, अजित बोरकर, सचिन पाटील, माने-देशमुख आदी उपस्थित होते.
उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ यंदा शेतकऱ्यांनी ऊस तोडीची घाई न करता थोडे थांबावे, उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू होतील. महाराष्ट्रातील कारखान्यांना उसाचा तुटवडा भासेल. शेतकऱ्यांनी संघटनेच्या आंदोलनाला पाठबळ द्यावे. – अजित बोरकर, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना