Headlines

नांदेडमधील प्रियदर्शनी शाळेत राखी पौर्णिमेचा उत्साह:भाऊ-बहिणीच्या नात्याला उजाळा




भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेचा उत्सव प्रियदर्शनी शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना प्रेमाने राखी बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला उजाळा दिला. राखी बांधताना विद्यार्थिनींनी आपल्या भावांच्या मनगटावर प्रेमाची आणि विश्वासाची राखी बांधली. विद्यार्थ्यांनीही बहिणींचे रक्षण करण्याचा आणि त्यांच्या सुख-दुःखात सदैव साथ देण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमामुळे शाळेच्या वातावरणात आनंद आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. राखी पौर्णिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या नात्याचे महत्त्व, परस्पर प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि जबाबदारी यांची जाणीव करून देण्यात आली. आधुनिक युगात बदलत्या जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असताना अशा उपक्रमांतून प्रेम आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. शाळेतील या उपक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमातून ‘नाती जपा, संस्कार जपा’ हा सुंदर संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. हेही वाचा.. कन्नड येथील विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या:कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा उपक्रम‎ कन्नड रक्षाबंधनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर पाठवल्या. ‘सीमेवरचा जवान हा आमचा भाऊ’ या भावनेतून राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थिनींमधील देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी दिसून आली. कडाक्याची थंडी, ऊन आणि पावसाची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळेच आपण सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतो. त्यामुळे त्यांच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाचा धागा पोहोचावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *