![]()
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत असला तरी, जोरदार पावसासाठी आवश्यक असलेली हवामान प्रणाली सध्या सक्रिय नाही. त्यामुळे दमदार पावसाची शक्यता कमी असून, ऊन आणि पावसाच्या खेळामुळे उकाडा वाढला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची विश्रांती कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील ४-५ दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, मात्र उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही पावसाने विश्रांती घेतली असून, पुढील ४-५ दिवस हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. सध्या या भागासाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कोरडे हवामान उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही पावसाने दडी मारली आहे. पुढील काही दिवस येथे हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसासाठी आणखी वाट पाहावी लागेल. विदर्भातही बहुतांश भागात पुढील ४-५ दिवस हवामान कोरडे, उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता असून, पावसाचा कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागात पावसाची तूट अद्याप कायम आहे. एकंदरीत, सध्या राज्यात दमदार पावसाची शक्यता नसून, बहुतांश भागात हवामान कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हेही वाचा.. बिहारच्या 20 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा: 50000 हून अधिक घरे पाण्यात; उत्तराखंडमध्ये भूस्खलन; हिमाचलमध्ये 70 रस्ते बंद बिहारच्या खगडिया आणि चंपारणसह 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहू शकतो. दुसरीकडे, नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधील 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा आणि गंडक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कोसी आणि बागमती नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. येथे 50 हजारांहून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. उत्तराखंडमधील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. गुरुवारी चमोली येथे भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग काही काळ बंद झाला होता. सविस्तर वाचा
Source link
राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची विश्रांती:हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज, मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता