![]()
पंढरपूर कॉरिडॉर बाबत तीर्थक्षेत्र बचाव समितीने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा आणि पर्यायी आराखड्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल, पंढरपूरचा विकास ५० वर्षांचाविचार करुन सर्वांना सोबत घेऊन, समन्वयाने कॉरिडॉरची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ””पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती””च्या शिष्टमंडळाची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत बचाव समितीच्या वतीने कॉरिडॉरला ठाम पण संयमी स्वरात विरोध दर्शवत पर्यायी विकास आराखडा सादर करण्यात आला. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक आमदार समाधान अवताडे, राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी देशमुख, शेळके व इथापे यांच्यासह महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्या अंतर्गत पंढरपूर शहर व परिसरामध्ये येणा-या भाविकांसाठी मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी एकात्मिक विकास आराखड्यास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करण्यासाठी जाहीर निविदा काढली आहे. सुमारे १९६७.१८ कोटी रुपयांच्या कामासाठी सल्लागार एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली आहे. सुमारे १७.४९ कोटी रुपये सल्लागार समितीवर खर्च केले जाणार आहेत. मुंबईत पर्यायी सूचनांचे स्वागत केले आहे. {तीर्थक्षेत्र बचाव समितीचे वतीने वारकरी पाईक संघ यांनी निर्माण केलेला तज्ञ इंजिनिअर निलेश बडवे महाजन व मयूर पिंपळनेरकर यांनी अपारकाष्टातून साकारलेला पंढरपूर विकासाचा आगळावेगळा आराखडा सादर केला. {वर्षानुवर्षे सरकारच्या पडेल पडलेल्या जागांचा वापर करण्यात यावा खाजगी जागांवर कॉरिडॉर नको. {पूरग्रस्त रेषेतून व स्मशानाच्या जवळून येणाऱ्या भावी दर्शन मंडपाच्या कामाला कडाडून विरोध करण्यात आला. {खादी ग्रामोद्योग व आसपासच्या मोकळ्या जागांवर मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्राचा अवाढव्य प्रकल्प करण्यात यावा. {कॉरिडोर विरोधात सुमारे ३१०० लोकांच्या हरकती असून त्यात कॉरिडॉरच्या बाजूने ५० सुद्धा लोक होते. बैठकीच्या शेवटी बचाव समितीच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांना शाल, पेढे, ग्रंथ आणि हिंदू महासभेचा स्वातंत्र्यवीर सावरकर रचित कुंडलिनी ‘कृपानांकित भगवा ध्वज’ विशेष भेट म्हणून प्रदान करण्यात आला. तसेच प्राजक्ता बेणारे यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.
Source link
तीर्थक्षेत्र बचाव समितीचा पर्यायी आराखडा; सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉर- मुख्यमंत्री:पंढरपूर कॉरिडॉर बाबत समितीसोबत मुंबईत बैठक, समितीच्या सूचनांचा विचार करु