Headlines

अमरावती रुग्णालय आगीवेळी फायर सिस्टिम ‘मॅन्युअल’ मोडवर होती:सीसीटीव्ही फुटेज ताब्यात, चौकशी समितीकडून तपास सुरू




अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात २४ ऑगस्ट रोजी आग लागून ३ नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेवेळी रुग्णालयातील फायर सेफ्टी सिस्टिम ऑटोमॅटिकऐवजी मॅन्युअल मोडवर असल्याची बाब समोर आली आहे. ही सिस्टिम मॅन्युअल मोडवर कशी गेली, याचा शोध चौकशी समिती घेत आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेज समितीने ताब्यात घेतले आहे. फायर सेफ्टी सिस्टिम आगीवेळी ती आपोआप सुरू होण्यासाठी ऑटोमॅटिक मोडवर ठेवणे आवश्यक होते. मात्र, दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी एसडीओ व तहसीलदारांच्या पाहणीत ही सिस्टिम मॅन्युअल मोडवर आढळली. दरम्यान, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुरुवारी रुग्णालयाची पाहणी केली असून, राज्यातील सर्व व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *