Headlines

अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना आता मराठीशिकण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ- फडणवीस:उत्तर प्रदेश निवडणुका,बिहारच्या राजकारणामुळे फडणवीसांचे ‘डॅमेज कंट्रोल’




अमराठी रिक्षा, टॅक्सीचालकांना दैनंदिन संवादापुरती जुजबी मराठी शिकण्यासाठी राज्य सरकारने आता १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत भाषेच्या कारणावरून चालकांवर कोणतीही दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. महायुती समर्थक हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखालील चालक संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर हा दिलासा देण्यात आला. प्रमाणपत्र वाटपात भोजपुरी
गाण्यांमुळे उद्धवसेना संतप्त मराठी भाषा प्रशिक्षण घेणाऱ्या रिक्षाचालकांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केला होता. त्यात भोजपुरी गाण्यावर नृत्य सादर झाल्याबद्दल ‘कार्यक्रमाचा आयोजक कोण? तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे!’ असा टोमणा उद्धवसेना पदाधिकारी अखिल चित्रेंनी लगावला. त्यावर सुर्वे म्हणाले की, कार्यक्रमात अनेक मराठी गाणी सादर झाली. उत्तर भारतीयांसाठी ते नृत्य सादर झाले होते. केंद्रातून हस्तक्षेप झाल्याने मुदतवाढीचा निर्णय मुंबईत मराठी सक्तीचे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पडसाद उमटले. २०२७ च्या यूपी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली. भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. हे सर्व लक्षात घेऊन १ वर्ष मुदतवाढीचा निर्णय झाला. दुसरीकडे, शिंदेसेनेने उद्धवसेना, मनसेचा मराठी मुद्दा काही प्रमाणात ताब्यात घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *